पुणे, दि.२ (लोकमराठी) – वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या प्रवाशाकडुन खंडणी उकाळणा-या टोळीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; फिर्यादी वय वर्षे ४१ यांना रिक्षामधील चार अनोळखी आरोपींनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देवुन त्यांच्या पत्नीकडून ऑनलाईन २५,०००/- रु मागुन खंडणी उकळल्या प्रकरणी रिक्षामधील चार अनोळखी आरोपीविरोद्ध बंडगार्डन पोलीस ठाणे गु.र.नं. ४०/२०२६ न्याय संहिता कलम ३०८ (५).३ (५) अन्वये गुन्हा दाखल करून न्यायालयाने सर्व आरोपींना दिनांक ०२/०३/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दाखल गुन्हयाचे तपासामध्ये आरोपींकडून गुन्हा करतेवेळी वापरलेली रिक्षा व गुन्ह्यातील खंडणी स्वरूपात घेतले रक्कमेपैकी १०,०००/- रुपये जप्त करण्यात आलेले आहेत. दाखल गुन्हयाचा अधिक तपास चालू आहे.
गणेश आण्णा जगधने वय २९ वर्ष रा. अमयाजॉट कॅनॉल, गुलटेकडी मुणे , अमोल उत्तम गायकवाड वय ३२ वर्ष रा. डायसप्लॉट कॅनॉल गुलटेवाडी, अतुल रविंद्र गायकवाड (वय ३८ वर्षे अंदाजे रा. रा. डायसप्लॉट कॅनॉल गुलटेकडी, पुणे), संतोष राधाकिशन सरोदे (वय ३१ वर्ष अंदाजे रा डायसप्लॉट कॅनॉल गुलटेकडी) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
तपास पथकातील अधिकारी व अंगलदार यांनी दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास करीत असताना तांत्रीक तपास व सीसीटीव्ही फुटेजव्दारे संशयीतांचा गुलटेकडी परीसरात शोध घेत असताना संशयीत आरोपी गणेश आण्णा जगधने (वय २९ वर्ष रा. अमयाजॉट कॅनॉल, गुलटेकडी मुणे, अमोल उत्तम गायकवाड वय ३२ वर्ष रा. डायसप्लॉट कॅनॉल गुलटेवाडी, पुणे) यांना दिनांक २५/२/ २०२६ रोजी ताब्यात घेवुन कसून चौकशी करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.
गुन्हा लवकरात लवकर उघडकिस आणण्याचे दृष्टीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, बडगार्डन पोलिस स्टेशन यांनी तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांना योग्य त्या सुचना देऊन मार्गदर्शन केले होते.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार, पोलीस सह.आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे विभाग मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ राजलक्ष्मी शिवणकर, सहाय्यक पोलिस आयुक्त लष्कर विभाग संगिता आल्फान्सो शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक पिरज गुप्ता, पो.अं. प्रदिप शितोळे, सारस साळयी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनिष संकपाळ, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केली आहे.
