पिंपरीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा २२० नागरिकांनी घेतला लाभ

  • विरोधी पक्षनेते अजित पवार व ज्येष्ठ नेते योगेश बहेल यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे शिबिराचे आयोजन

पिंपरी, ता. १७ : राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार तसेच शहराचे ज्येष्ठ नेते माजी महापौर योगेश बहल यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या संकल्पनेतून आज मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. पिंपरी येथील सावित्रीबाई फुले ग्रंथालय येथे प्रभाग क्रमांक १७ व १८ मधील सुमारे २२० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये कान, नाक, घसा व नेत्र आदी तपासण्या करण्यात आल्या. 

यावेळी बोलताना योगेश बहेल (Yogesh Behal) म्हणाले की, “पिंपरी चिंचवडचे विकास पुरुष विरोधी पक्षनेते अजितदादा पवार (Ajitdada Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) सर्व सेल तर्फे शहरात येत्या पूर्ण महिनाभर लोकोपयोगी कार्यक्रम पक्षाद्वारे राबवले जातील. राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष इम्रान शेख (Imran Shaikh) यांच्या नेतृत्वात अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असून येणाऱ्या काळात अनेक लोकोपयोगी कार्यक्रम राष्ट्रवादी तर्फे घेतले जातील. राष्ट्रवादी पक्ष नेहमीच गोरगरीब लोकांच्या पाठीमागे उभा राहिला आहे. सर्व शहरातील नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण करणे, हे आमचे कर्तव्य असून आम्ही शहराचा विकास कसा होईल, यासाठी प्रयत्नशील असतो. पिंपरी चिंचवडमध्ये जो काही विकास झाला आहे, तो आदरणीय अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेसनेच केला आहे, व यावेळेस येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा महापालिकेवर शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वात आम्ही नक्कीच फडकवणार. जगाला हेवा वाटेल असं शहर पिंपरी चिंचवडला बनवणार.” असे ते म्हणाले.

याप्रसंगी बोलताना युवक अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले की, “कष्टकरी, कामगार, अंग मेहनत करणारे नागरिक हे नेहमीच आपला आजारपण अंगावर काढत असतात. काही नागरिक इच्छा असताना देखील डॉक्टरांची फीस जास्त असल्यामुळे दवाखान्यात जात नाहीत. त्यांच्या भावना समजून राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे हे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले, व इथून पुढे प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या वार्डात प्रभागात अशा प्रकारचे आरोग्य शिबिरचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी करून होणार आहे.”

या शिबिराचे उद्घाटन योगेश बहल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलाध्यक्षा कविता आल्हाट, माजी शिक्षण मंडळ सभापती विजय लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यावेळी माजी नगरसेवक समीर मासुळकर, माजी नगरसेविका गीता मंचरकर, माजी नगरसेवक नारायण बहिरवडे, युवा नेते वीरेंद्र बहल, ज्ञानेश्वर कांबळे, राष्ट्रवादी ख्रिश्चन सेल महिला अध्यक्षा रेजिना फ्रान्सिस, अश्विनी कांबळे, रीमा रंजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष आयुष निंबारकर, शहर उपाध्यक्ष अमोल रावळकर, तुषार ताम्हणे, लवकुश यादव, सरचिटणीस दीपक गुप्ता, अनुज देशमुख, शहर सचिव कुणाल कडू, ओम शिरसागर, मयुर खरात, समाधान अचलखांब, विजय शिंगाडे, प्रकाश गवई, निलेश लोंढे, धनराज चौधरी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर सचिव अमोल बेंद्रे यांनी केले.

Recent Posts