अब्दुल अहद शेख याने आंतरराष्ट्रीय मास रेसलिंग स्पर्धेत पटकावले सुवर्ण पदक तर बेल्ट रेसलिंग स्पर्धेत कांस्यपदक

अब्दुल अहद शेख याने आंतरराष्ट्रीय मास रेसलिंग स्पर्धेत पटकावले सुवर्ण पदक तर बेल्ट रेसलिंग स्पर्धेत कांस्यपदक

पिंपरी : अझरबैजान देशातील गोयगोल रीजनमध्ये २८ जुलै ते ५ ऑगस्ट २०२२ दरम्यान आंतरराष्ट्रीय बेल्ट रेसलिंग आणि मास रेसलिंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यातील मास रेसलिंग (सामूहिक कुस्ती) स्पर्धेत अब्दुल अहम शेख याने १२५ किलो वजन गटात सुवर्णपदक आणि बेल्ट कुस्तीमध्ये कांस्यपदक पटकावले. क्रीडा मंत्रालय, अझरबैजान सरकार आणि जागतिक एथनोस्पोर्ट्स फेडरेशन यांनी या स्पर्धांचे आयोजन केले होते.

अब्दुल शेख (Abdul Shaikh) हा डॉ. डी. पाटील कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्समध्ये (Dr. D Y Patil College) बारावीत शिकत असलेला खेळाडू आहे. त्याला या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता किशोर नखाते, रंजीत कलाटे, कैलास बारणे, अभिषेक बारणे, तानाजे बारणे, नाना काटे यांनी सर्व सहकार्य केले.

अब्दुल शेख याने यापूर्वी एक वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला असून यावेळी त्याने सुवर्ण व कांस्य पदकांची कमाई केली. शेख याला प्रशिक्षक उमरकासीम तांबोळी यांनी मार्गदर्शन करत सर्व तयारी करून घेतली. दरम्यान, शेख हा याच क्रिडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर गेली तीन वर्षे सातत्याने सुवर्णपदक पटकावत आहे.