निवडणुकीत आपल्यासाठी चांगला आणि स्वस्त दवाखाना व शाळा आणि रोजगार मागू…मंदिर, मस्जिद नाही

निवडणुकीत आपल्यासाठी चांगला आणि स्वस्त दवाखाना व शाळा आणि रोजगार मागू…मंदिर, मस्जिद नाही

क्रिकेटर युवराज सिंहने कॅन्सरचा इलाज बाहेर देशात केला. मनिषा कोईरालानी तिचा इलाज बाहेर देशातच केला. सोनिया गांधीचा पण बाहेर देशातच इलाज करणं चालू आहे. शरद पवार पण त्यांचा इलाज बाहेर देशातच करतात. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि हिंदी सिनेमाचे अभिनेता इरफान खान आजारी पडले आणि भारतात हवा तसा इलाज न झाल्यामुळे बाहेर देशात गेले.

भारतामध्ये ना मंदिराची कमी आहे ना मस्जिदची. जगातील सर्वात शक्तिशाली ईश्वर कदाचित भारतातच असतील. मग ही लोकं इलाज करण्यासाठी बाहेर देशात का जात आहेत. भावांनो शरीरातील रोगांचा इलाज विज्ञानाद्वारा होतो, ही सत्य गोष्ट आहे आणि आपला भारत विज्ञानाच्या क्षेत्रात मागे आहे, म्हणूनच ही लोकं बाहेर इलाज करत आहेत. असच म्हणावं लागेल. जर आपल्याला असा आजार झाला तर आपल मरण नक्की आहे.

इतके पैसे आपल्याकडे कुठून येतील बाहेर देशात जाण्यासाठी. मग नंतर बहाणा असेल मरायची वेळ आली होती म्हणून झालं. खर सांगायचं म्हणजे चांगले हॉस्पिटल, चांगले शाळा, यांच्या प्रती वैज्ञानिक दृष्टिकोन या गोष्टीची आवश्यकता सामान्य माणसाला अधिक आहे. पण हे पैसेवाले लोक आपल्याला मंदिर, मस्जिद मध्ये वाटून स्वतः बाहेर देशात जात असतात. या निवडणुकीत आपण आपल्यासाठी चांगला आणि स्वस्त दवाखाना व शाळा आणि रोजगार मागू. मंदिर, मस्जिद नाही.

कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा बिलकुल उद्देश नाही, पण ज्या गोष्टीची सध्या अधिक गरज आहे त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे.

  • एक नागरिक