Author: Lokmarathi Team

रिपब्लिकन पक्षाच्या  महाराष्ट्रातील कामगीरीकडे देशाचे लक्ष – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
महाराष्ट्र

रिपब्लिकन पक्षाच्या  महाराष्ट्रातील कामगीरीकडे देशाचे लक्ष – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि.२३. (लोकमराठी) - देशभरात रिपब्लिकन पक्षाचे संघटन वाढत आहे. ईशान्य भारतात रिपब्लिकन पक्षाला राजकीय यश लाभत आहे. नुकत्यात झालेल्या नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे दोन आमदार निवडुन आले. देशभरात रिपब्लिकन पक्षाच्या नावाची चर्चा झाली. त्यामुळे  येणा-या मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष किती जागांवर विजय मिळवतो . आगामी काळेात महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्ष काय राजकिय कामगिरी करणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे  रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांत आपले उमेदवार निवडुन आणण्याची कामगिरी करून दाखवावी, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.  गोराई येथील हॉटेल बेव्हयु सभागृहात आमचे रामदास आठवले या गीताच्या  ध्वनीचित्रफितीचे ना.रामदास आठवले ...
मावळातील वेहेरगावात मूक पदयात्रेद्वारे छत्रपतींचे स्मरण.
पुणे

मावळातील वेहेरगावात मूक पदयात्रेद्वारे छत्रपतींचे स्मरण.

लोणावळा, दि.२२ (लोकमराठी) - धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा ३३४ वा स्मृतीदिन धर्माप्रति बलिदान दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्त वेहेरगाव येथे विविध कार्यक्रम पार पडले. धर्मवीर बलिदान मास फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन वद्य अमावस्या आंग्ल दिनांक २१ फेब्रुवारी ते २१ मार्चया महिन्याच्या कालावधीमध्ये वेहेरगाव गावामध्ये शिवशंभु प्रतिष्ठानच्या वतीने महिला व ग्रामस्थ सातत्याने माता भगिनी, धारकरी, लहान मुले- मुली यांनी रोज एकत्रित येऊन संध्याकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना दररोज श्रद्धांजली अर्पित केली. दि. ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माता भगिनी यांना रायगड दर्शन करून आणण्यात आले. या कालावधीमध्ये धर्मजागर करण्यासाठी संप्रदाय क्षेत्रातील,शिवचरिकार यांना आमंत्रित करून त्यांनी धर्मावर सुंदर असे मार्गदर्शन केले. यामध्ये सातत्याने महिनाभर वेह...
चऱ्होली येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने उद्या धर्मवीर मूक पदयात्रा
पिंपरी चिंचवड

चऱ्होली येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने उद्या धर्मवीर मूक पदयात्रा

भोसरी, दि.२० (लोकमराठी) - धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ३३४ वा बलिदान दिन अर्थात फाल्गुन अमावस्या निमित्त मंगळवार, दि.२१ मार्च रोजी वेताळबुवा चौक, बैलगाडा घाटाजवळ, चऱ्होली बुद्रुक येथे धर्मवीर मूक पदयात्रेचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या काळी न निघालेल्या अंत्ययात्रेचे स्मरण म्हणून निघणाऱ्या मूक पदयात्रेत सहभागी होऊन छत्रपती संभाजी महाराजांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने समाज बांधवांनी आणि माता भगिनींनी आपले आद्य धर्म कर्तव्य म्हणून उपस्थित राहावे. ...
आक्रोश तरुणांचा, एल्गार युवक काँग्रेसचा | उद्या मुंबई येथे युवक काँग्रेसतर्फे विधानसभेला घेराव 
महाराष्ट्र

आक्रोश तरुणांचा, एल्गार युवक काँग्रेसचा | उद्या मुंबई येथे युवक काँग्रेसतर्फे विधानसभेला घेराव 

पिंपरी, दि. २० मार्च २०२३ : केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांवरती जनता नाराज असून सरकारच्या या धोरणांमुळे जनता मेटाकुटीला आली आहे. त्यामुळे या चुकीच्या धोरणांविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्याअनुषंगाने उद्या मंगळवारी (दि. २१ मार्च २०२३) मुंबईत विधानसभा घेराव आंदोलन केले जाणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी दिली आहे.  याबाबत जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कोणतीही राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अस्थिरता ही सरकारच्या धोरणाचे अपत्य असते. गेल्या नऊ वर्षातील मोदी सरकारचे धोरण पाहता अच्छे दिन नको जुने दिन परत आणा अशी बहुसंख्य भारतीयांची भावना झाली आहे. नोटबंदीचे अघोरी कृत्य, सेवा आणि वस्तू कर यांची चुकीची अंमलबजावणी आणि रशिया-युक्रेन युद्ध यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर भीषण परिणाम झाला आहे. तरुणाई ...
मोटार सायकल चोर जेरबंद, साडेतीन लाखांच्या दहा मोटार सायकल जप्त; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची आठवडयाभरातील दुसरी धडाकेबाज कारवाई
पुणे

मोटार सायकल चोर जेरबंद, साडेतीन लाखांच्या दहा मोटार सायकल जप्त; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची आठवडयाभरातील दुसरी धडाकेबाज कारवाई

पुणे, दि. १८ (लोकमराठी) - पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने (एसीबी) मोटार सायकल चोरी करणाऱ्या चोरास जेरबंद करण्यात आले आहे. यासह साडेतीन लाखांच्या दहा मोटार सायकल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रकाश महादु दुधवडे( वय -२३ वर्षे, रा.पोखरी, पवळदरा, ता. संगमनेर, जि.अहमदनगर ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; पुणे ग्रामीण मध्ये मागील वर्षभरात सायकल चोरींच्या प्रकरणात कमालीची वाढ दिसून आली. याबाबत पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मोटार सायकल चोरीबाबत वैयक्तीक दृष्टया लक्ष देवून कारवाई करणेबाबत सुचना केल्या होत्या. त्यानुसार ९ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेमार्फत मोटार सायकल चोरावर मोठी कारवाई करत दहा लाख रूपये किंमतीच्या एक...
खराळवाडीतील तरूणीचा येरवड्यातील इमारतीखाली आढळला मृतदेह 
पिंपरी चिंचवड

खराळवाडीतील तरूणीचा येरवड्यातील इमारतीखाली आढळला मृतदेह 

तरूणीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्याची महिला काँग्रेसची मागणी  पिंपरी : खराळवाडी येथील १७ वर्षीय तरुणी मंगळवारी (दि. १४ मार्च २०२३) रात्री येरवडा येथे गेली होती. तेथे एका इमारतीच्या खाली तिचा मृतदेह आढळला. या तरूणाचा घातपात झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सायली किरण नढे यांनी येरवडा पोलीसांकडे केली आहे.  याबाबत शहराध्यक्षा सायली नढे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी सेक्रेटरी स्वाती शिंदे यांनी येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरीतील खराळवाडी येथील तरुणी मंगळवारी रात्री येरवडा येथे गेली होती. तेथे एका इमारतीच्या खाली तिचा मृतदेह आढळला. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ता...
मावळ येथे “सौभाग्यवती २०२३ ” खेळ रंगला महिलांचा तसेच सुषमा स्वराज ॲवार्ड कार्यक्रम उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी, पुणे

मावळ येथे “सौभाग्यवती २०२३ ” खेळ रंगला महिलांचा तसेच सुषमा स्वराज ॲवार्ड कार्यक्रम उत्साहात संपन्न

मावळ, दि.१६ (लोकमराठी) - पुणे (ता.मावळ) येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भाजपा महिला आघाडी, भाजपा मावळ तालुका महिला अध्यक्षा सायली जितेंद्र बोत्रे व नाणे मावळ भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने "सौभाग्यवती २०२३ " खेळ रंगला महिलांचा तसेच सुषमा स्वराज ॲवार्ड ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्‍घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, जिल्हा अध्यक्ष गणेशतात्या भेगडे तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे , दूध संघाचे डायरेक्टर बाळासाहेब नेवाळे, राजमाता जिजाऊ महिला मंचच्या अध्यक्षा सारिका संजय भेगडे, लोनावळा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधरजी पुजारी, बाळासाहेब घोटकुले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महिलांना ...
वडगाव शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ववत चालू करा ; वडगाव मावळ महिला मोर्चाचे निवेदन..
पुणे

वडगाव शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ववत चालू करा ; वडगाव मावळ महिला मोर्चाचे निवेदन..

वडगांव मावळ, दि.१५ (लोकमराठी) - वडगाव शहरातील बंद पडलेली सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ववत सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन वडगाव मावळ भाजप महिला आघाडी अध्यक्षा धनश्री भोंडवे यांनी महिला मोर्चाच्या वतीने वडगाव नगरपंचायत तसचे वडगाव पोलिस स्टेशन यांना दिले. वडगाव शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन,तसेच अनेक शासकीय कार्यालये असल्यामुळे वडगांव शहरात नागरिकांची वर्दळ वाढत आहे. या गर्दीचा गैरफायदा घेऊन चोऱ्या, वाटमारी, छेडछाड असे अनेक प्रकार सर्रास होतं आहेत. तसेच अनेक ठिकाणे ही नशापान करण्याची केंद्रे बनत आहेत व याचा समस्त वडगावकर नागरिकांस मनस्ताप सहन करावा लागत आहे. महिलावर्ग भीतीच्या छायेखाली वावरत आहे. या सर्व लांछनास्पद गोष्टींना आळा बसावा यासाठी वडगाव शहर भाजपा महिला मोर्चा ने शहरात सर्व वर्दळीच्या तसेच प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अथवा असलेले कार्यान्वित करावेत, अशी आग्रही मागण...
मागील वर्ष ठरले रा. स्व. संघाच्या दृष्टीने कार्यविस्ताराचे सकारात्मक वर्ष – नाना जाधव
पुणे

मागील वर्ष ठरले रा. स्व. संघाच्या दृष्टीने कार्यविस्ताराचे सकारात्मक वर्ष – नाना जाधव

पुणे दि. १५ (लोकमराठी) - मागील वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने कार्यविस्ताराचे सकारात्मक वर्ष होते. येत्या दोन वर्षात पश्चिम महाराष्ट्र प्रांतात अधिक जोमाने कामाचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक प्रा. सुरेश (नाना) जाधव यांनी दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १२ ते १४ मार्च २०२३ दरम्यान समलखा (पानिपत) येथे झाली. प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील सद्य स्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रा.स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले, विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी उपस्थित होते. पाच आयामांवर लक्ष केंद्रीत करणार…रा. स्व. संघाचे येत्या काळात सामाजिक परिवर्तनाच्य...
वडगाव नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना वाढीव शास्ती कर माफ करून, ग्रामपंचायत काळातील अनधिकृत बांधकामे नियमित करा; वडगाव मावळ भाजपची मागणी
पुणे

वडगाव नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना वाढीव शास्ती कर माफ करून, ग्रामपंचायत काळातील अनधिकृत बांधकामे नियमित करा; वडगाव मावळ भाजपची मागणी

वडगाव मावळ, दि.१४ (लोकमराठी) - वडगाव नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना वाढीव शास्ती कर माफ करून,गावठाण हद्द वाढल्यामुळे ग्रामपंचायत काळातील अनधिकृत बांधकामे नियमित करा; अशी मागणी वडगाव मावळ भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. वडगाव मावळ भाजपचे शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी नगरपंचायत सी ओ प्रविण निकम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की; मार्च २०१८ रोजी वडगाव ग्रामपंचायत चे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाल्यामुळे नगर विकास खात्याच्या नियमास अधिम राहून आपण कर आकारणी मध्ये बदल निश्चित करून कर आकारणी केली आहे, परंतु वडगाव शहर मधील सर्व मिळकत धारक यांना आपल्या चुकीच्या कर आकारणी सर्वेक्षणामुळे वाढीव कर लागून आला आहे. सन २०१६ पर्यंत वडगाव शहराकरिता पी एम आर डी च्या नव्हे तर ग्रामपंचायत च्या परवानगीने बांधकामे होत होती.तरी ग्रामपंचायत काळातील करा सहित थकीत कर हा मिळकत धारकांना शास्ती कर म्हणून आकारला आहे ह...