एस. एम. जोशी कॉलेजमध्ये पक्षी सप्ताह विविध उपक्रमांनी संपन्न

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये पक्षी सप्ताह विविध उपक्रमांनी संपन्न

हडपसर 16 (प्रतिनिधी) : पक्षी निरीक्षण हा आनंददायी छंद आहे. लोकांनी वेळ काढून तलाव, माळरान, जंगल, पाणथळ जागेत जाऊन पक्षांचे निरीक्षण करावे. असे विचार वाडिया कॉलेजचे प्रा. डॉ. सोमनाथ वाघमारे यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड यांनी अध्यक्ष म्हणून बोलताना सांगितले की, भारताच्या भूमीत विविध प्रकारचे पक्षी आपण पाहतो. जैवविविधता आपण समजून घेतली पाहिजे. पक्षांचे संवर्धन आपण केले पाहिजे. असे विचार व्यक्त केले.

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये पक्षी सप्ताह विविध उपक्रमांनी संपन्न

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. अशोक पांढरबळे यांनी तर पाहुण्यांचा परिचय डॉ. सोपान ऐनार यांनी केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने रांगोळी, फोटोग्राफी, निबंध, बर्ड नेक्स्ट, मेकिंग वर्कशॉप या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये पक्षी सप्ताह विविध उपक्रमांनी संपन्न

हा कार्यक्रम प्राणिशास्त्र विभागाने आयोजित केला होता. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. हेमलता कारकर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, डॉ. शिल्पा शितोळे यांनी आपले अनुभव कथन केले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. किशोर काकडे, डॉ. एस. पी. खुंटे, डॉ. एम. एन. रास्ते, डॉ.के. बी. पठाडे, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, कार्यालयीन सेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अर्चना पाटील व प्रा. अमोल पवार यांनी केले. तर आभार डॉ. हेमलता कारकर यांनी मानले.