चऱ्होली येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने उद्या धर्मवीर मूक पदयात्रा
भोसरी, दि.२० (लोकमराठी) - धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ३३४ वा बलिदान दिन अर्थात फाल्गुन अमावस्या निमित्त मंगळवार, दि.२१ मार्च रोजी वेताळबुवा चौक, बैलगाडा घाटाजवळ, चऱ्होली बुद्रुक येथे धर्मवीर मूक पदयात्रेचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या काळी न निघालेल्या अंत्ययात्रेचे स्मरण म्हणून निघणाऱ्या मूक पदयात्रेत सहभागी होऊन छत्रपती संभाजी महाराजांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने समाज बांधवांनी आणि माता भगिनींनी आपले आद्य धर्म कर्तव्य म्हणून उपस्थित राहावे.
...