पुणे

Lok Marathi News Pune – Pune Marathi News by Lok Marathi News ( LokMarathi.in )

मावळातील वेहेरगावात मूक पदयात्रेद्वारे छत्रपतींचे स्मरण.
पुणे

मावळातील वेहेरगावात मूक पदयात्रेद्वारे छत्रपतींचे स्मरण.

लोणावळा, दि.२२ (लोकमराठी) - धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा ३३४ वा स्मृतीदिन धर्माप्रति बलिदान दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्त वेहेरगाव येथे विविध कार्यक्रम पार पडले. धर्मवीर बलिदान मास फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन वद्य अमावस्या आंग्ल दिनांक २१ फेब्रुवारी ते २१ मार्चया महिन्याच्या कालावधीमध्ये वेहेरगाव गावामध्ये शिवशंभु प्रतिष्ठानच्या वतीने महिला व ग्रामस्थ सातत्याने माता भगिनी, धारकरी, लहान मुले- मुली यांनी रोज एकत्रित येऊन संध्याकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना दररोज श्रद्धांजली अर्पित केली. दि. ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माता भगिनी यांना रायगड दर्शन करून आणण्यात आले. या कालावधीमध्ये धर्मजागर करण्यासाठी संप्रदाय क्षेत्रातील,शिवचरिकार यांना आमंत्रित करून त्यांनी धर्मावर सुंदर असे मार्गदर्शन केले. यामध्ये सातत्याने महिनाभर वेह...
पुणे

मोटार सायकल चोर जेरबंद, साडेतीन लाखांच्या दहा मोटार सायकल जप्त; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची आठवडयाभरातील दुसरी धडाकेबाज कारवाई

पुणे, दि. १८ (लोकमराठी) - पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने (एसीबी) मोटार सायकल चोरी करणाऱ्या चोरास जेरबंद करण्यात आले आहे. यासह साडेतीन लाखांच्या दहा मोटार सायकल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रकाश महादु दुधवडे( वय -२३ वर्षे, रा.पोखरी, पवळदरा, ता. संगमनेर, जि.अहमदनगर ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; पुणे ग्रामीण मध्ये मागील वर्षभरात सायकल चोरींच्या प्रकरणात कमालीची वाढ दिसून आली. याबाबत पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मोटार सायकल चोरीबाबत वैयक्तीक दृष्टया लक्ष देवून कारवाई करणेबाबत सुचना केल्या होत्या. त्यानुसार ९ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेमार्फत मोटार सायकल चोरावर मोठी कारवाई करत दहा लाख रूपये किंमतीच्या एक...
ताज्या घडामोडी, पुणे

मावळ येथे “सौभाग्यवती २०२३ ” खेळ रंगला महिलांचा तसेच सुषमा स्वराज ॲवार्ड कार्यक्रम उत्साहात संपन्न

मावळ, दि.१६ (लोकमराठी) - पुणे (ता.मावळ) येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भाजपा महिला आघाडी, भाजपा मावळ तालुका महिला अध्यक्षा सायली जितेंद्र बोत्रे व नाणे मावळ भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने "सौभाग्यवती २०२३ " खेळ रंगला महिलांचा तसेच सुषमा स्वराज ॲवार्ड ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्‍घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, जिल्हा अध्यक्ष गणेशतात्या भेगडे तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे , दूध संघाचे डायरेक्टर बाळासाहेब नेवाळे, राजमाता जिजाऊ महिला मंचच्या अध्यक्षा सारिका संजय भेगडे, लोनावळा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधरजी पुजारी, बाळासाहेब घोटकुले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महिलांना ...
पुणे

वडगाव शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ववत चालू करा ; वडगाव मावळ महिला मोर्चाचे निवेदन..

वडगांव मावळ, दि.१५ (लोकमराठी) - वडगाव शहरातील बंद पडलेली सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ववत सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन वडगाव मावळ भाजप महिला आघाडी अध्यक्षा धनश्री भोंडवे यांनी महिला मोर्चाच्या वतीने वडगाव नगरपंचायत तसचे वडगाव पोलिस स्टेशन यांना दिले. वडगाव शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन,तसेच अनेक शासकीय कार्यालये असल्यामुळे वडगांव शहरात नागरिकांची वर्दळ वाढत आहे. या गर्दीचा गैरफायदा घेऊन चोऱ्या, वाटमारी, छेडछाड असे अनेक प्रकार सर्रास होतं आहेत. तसेच अनेक ठिकाणे ही नशापान करण्याची केंद्रे बनत आहेत व याचा समस्त वडगावकर नागरिकांस मनस्ताप सहन करावा लागत आहे. महिलावर्ग भीतीच्या छायेखाली वावरत आहे. या सर्व लांछनास्पद गोष्टींना आळा बसावा यासाठी वडगाव शहर भाजपा महिला मोर्चा ने शहरात सर्व वर्दळीच्या तसेच प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अथवा असलेले कार्यान्वित करावेत, अशी आग्रही मागण...
पुणे

मागील वर्ष ठरले रा. स्व. संघाच्या दृष्टीने कार्यविस्ताराचे सकारात्मक वर्ष – नाना जाधव

पुणे दि. १५ (लोकमराठी) - मागील वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने कार्यविस्ताराचे सकारात्मक वर्ष होते. येत्या दोन वर्षात पश्चिम महाराष्ट्र प्रांतात अधिक जोमाने कामाचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक प्रा. सुरेश (नाना) जाधव यांनी दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १२ ते १४ मार्च २०२३ दरम्यान समलखा (पानिपत) येथे झाली. प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील सद्य स्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रा.स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले, विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी उपस्थित होते. पाच आयामांवर लक्ष केंद्रीत करणार…रा. स्व. संघाचे येत्या काळात सामाजिक परिवर्तनाच्य...
पुणे

वडगाव नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना वाढीव शास्ती कर माफ करून, ग्रामपंचायत काळातील अनधिकृत बांधकामे नियमित करा; वडगाव मावळ भाजपची मागणी

वडगाव मावळ, दि.१४ (लोकमराठी) - वडगाव नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना वाढीव शास्ती कर माफ करून,गावठाण हद्द वाढल्यामुळे ग्रामपंचायत काळातील अनधिकृत बांधकामे नियमित करा; अशी मागणी वडगाव मावळ भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. वडगाव मावळ भाजपचे शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी नगरपंचायत सी ओ प्रविण निकम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की; मार्च २०१८ रोजी वडगाव ग्रामपंचायत चे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाल्यामुळे नगर विकास खात्याच्या नियमास अधिम राहून आपण कर आकारणी मध्ये बदल निश्चित करून कर आकारणी केली आहे, परंतु वडगाव शहर मधील सर्व मिळकत धारक यांना आपल्या चुकीच्या कर आकारणी सर्वेक्षणामुळे वाढीव कर लागून आला आहे. सन २०१६ पर्यंत वडगाव शहराकरिता पी एम आर डी च्या नव्हे तर ग्रामपंचायत च्या परवानगीने बांधकामे होत होती.तरी ग्रामपंचायत काळातील करा सहित थकीत कर हा मिळकत धारकांना शास्ती कर म्हणून आकारला आहे ह...
पुणे

मावळातील लोहगडावर शिवजयंती उत्साहात साजरी

मळवली, दि.११ (लोकमराठी) - श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच व ग्रामस्थांच्या वतीने किल्ले लोहगड पायथ्याच्या शिवस्मारकावर दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मंचाच्या कार्यकर्त्यांनी सुंदर फुलमाळांनी, रांगोळ्यांनी व भगव्या पडद्यांनी शिवस्मारक सजावट केली होती. दीपोत्सवात हजारो दिव्यांच्या लखलखाटात शिवस्मारक उजळून निघाले होते. शिववंदनेने महाराजांना अभिवादन करण्यात आले. शिवघोषणांनी गडपरिसर दुमदुमून गेला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन शिवभक्त शिवजयंतीच्या आदल्या दिवशी लोहगडवरून शिवज्योत प्रज्वलित करून आपापल्या गावी घेऊन जाण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते. सर्व शिवमंडळांनी शिवस्मारकावरून ज्योत प्रज्वलित करून महाराजांचा जयघोष केला. मंचाच्या वतीने आलेल्या शिवभक्तांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या सर्वांची मंचाच्या वतीन...
पुणे

मोटार सायकल चोरी प्रकरणी आंतरजिल्हा टोळीतील नऊ जणांना अटक; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

पुणे दि.१० (लोकमराठी) - पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा विभागाने कारवाई करत मोटरसायकल चोरी करणाऱ्या अंतर जिल्हा टोळीच्या दोन म्होरक्यांसह एकूण नऊ सदस्यांना जेरबंद करत २९ मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत. अमोल नवनाथ मधे (रा. वाघवाडी पोखरी ता पारनेर जि अहमदनगर), विजय संजय मधे (रा. निमदरी ता पारनेर जि अहमदनगर), संतोष उमेश मधे (रा. रा. केळेवाडी पोखरी पवळदरा ता. पारनेर जि अहमदनगर), संदिप सुभाष मधे, (रा. केळेवाडी), धरणाचे वर कातळमाळ ता संगमनेर,( जि. अहमदनगर) , विकास साहेबराव मधे (रा. पवळदरा मधेवस्ती पोखरी ता पारनेर जि अहमदनगर) , विजय विठ्ठल जाधव (रा. कुरकुंडी ता संगमनेर जि अहमदनगर), सुनील वामन मेंगाळ( रा. धरणमळई वाडी बोटा ता संगमनेर), भारत पोपट मेंगाळ (रा. गारोळे पठार ता संगमनेर जि अ नगर),मयुर गंगाराम मेंगाळ (रा आंबीदुमाला ता संगमनेर जि अ नगर) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपींच...
पुणे

देहूरोड पोस्ट अॉफीस मध्ये केक कापून जागतिक महिला दिन उत्सवात साजरा

पुणे, दि.९ (लोकमराठी) - जागतिक महिला दिनानिमित्ताने देहूरोड पोस्ट अॉफीस विभागातील महिला अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने एकत्र येत केक कापून आनंदोत्सव साजरा केला. कार्यक्रमात सर्वप्रथम भारताच्या प्रथम महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अगरबत्ती व मेणबत्ती लावून सामूहिक वंदना घेण्यात केली. त्यानंतर जागतिक महिला दिननिमित्त महिलांचे भाषण झाले. त्यानंतर पोस्टात आलेल्या ग्राहक महिला भगिनींचा सन्मान गवळी मॕडम यांच्या हस्ते करण्यात आला. पोस्टमास्टर गवळी मॕडम, सारिका पाटील ,प्राजक्ता कदम,उषा मुने,योगिता केंगले,सुजाता रोकडे,रितीका साळूंके,अमृता गवळी यांचा देखील सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन NFPE युनियनचे सचिव महेश टकले,श्रीराम वायाळ,लक्ष्मण सुकटे,अशोक गोफणे,तुषार मळेकर,साहिल शेख,दिपक हाकदाळे, प्रल्हाद शिंदे,मयुर जाधव,महेंन्द कांबळे, मुकूंद बार...
पुणे

शिवजयंतीला लोहगडचा गणेश दरवाजा चोवीस तास उघडा ठेवा; शिवभक्तांची मागणी

मळवली, दि.७ (लोकमराठी) - शिवजयंती सारख्या राज्यव्यापी आनंद सोहळ्याच्या दिवशी लोहगड किल्ला चोवीस तास उघडा ठेवा; अशी तीव्र मागणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या शिवप्रेमींकडून करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे येत्या १० मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून शिवप्रेमी मोठया संख्येने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड-किल्ल्यावर येत असतात आणि शिवज्योत प्रज्वलित करून आपापल्या गावी घेऊन जातात. मावळ तालुक्यातील लोहगड हा किल्ला त्यापैकी एक. भक्कम तटबंदी, बुरुज, पाच दरवाजे यामुळे लोहाप्रमाणे मजबूत किल्ला अशी लोहगडची ओळख आहे. किल्ल्यावर ऐतिहासिक तलाव, पाण्याच्या टाक्या, पुरातन शिवमंदीर आहे. तसेच, पायथ्याला भव्य शिवस्मारक साकारलेले आहे. लोहगडला जोडणारे सुस्थितीतील रस्ते, दळणवळणाच्या सोयी, निसर्गरम्य ठिकाण ...
Join WhatsApp Group
Exit mobile version