

पुणे, दि.९ (लोकमराठी) – जागतिक महिला दिनानिमित्ताने देहूरोड पोस्ट अॉफीस विभागातील महिला अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने एकत्र येत केक कापून आनंदोत्सव साजरा केला.
कार्यक्रमात सर्वप्रथम भारताच्या प्रथम महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अगरबत्ती व मेणबत्ती लावून सामूहिक वंदना घेण्यात केली. त्यानंतर जागतिक महिला दिननिमित्त महिलांचे भाषण झाले.
त्यानंतर पोस्टात आलेल्या ग्राहक महिला भगिनींचा सन्मान गवळी मॕडम यांच्या हस्ते करण्यात आला.
पोस्टमास्टर गवळी मॕडम, सारिका पाटील ,प्राजक्ता कदम,उषा मुने,योगिता केंगले,सुजाता रोकडे,रितीका साळूंके,अमृता गवळी यांचा देखील सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन NFPE युनियनचे सचिव महेश टकले,श्रीराम वायाळ,लक्ष्मण सुकटे,अशोक गोफणे,तुषार मळेकर,साहिल शेख,दिपक हाकदाळे, प्रल्हाद शिंदे,मयुर जाधव,महेंन्द कांबळे, मुकूंद बाराथे,शिवप्रसाद खोमणे यांनी यशस्वीपणे पार पाडले.