डॉ . डी. वाय पाटील आयुर्वेद रुग्णालया मार्फत मोफत विशेष सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन

पिंपरी, दि.३१ (लोकमराठी) – डॉ . डी. वाय पाटील आयुर्वेद रुग्णालया मार्फत मोफत विशेष सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर डॉ . डी. वाय पाटील विद्यापीठ ,पुणे संलग्नित डॉ . डी. वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद , हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर , पिंपरी पुणे येथे दि. १ फेब्रुवारी (बुधवार) रोजी ते २० फेब्रुवारी (सोमवार) २०२३ पर्यंत मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराची वेळ स.९ ते दु. ४ वा. पर्यंत असेल. रविवारी सुट्टी राहील. कृपया रुग्णांनी याची नोंद घ्यावी.

शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून संधिवात, आमवात, पक्षघात, वातरक्त, मधुमेह, दमा, केस गळणे,- पांढरे होणे, रक्तदाब, लठ्ठपणा, सर्व प्रकारच्या पंचकर्म चिकित्सा -सल्ला मार्गदर्शन , बालपक्षघात, पोटदुखी, जन्तांचा त्रास, लहान मुलांमधील त्वचा विकार, मुलांचे वजन न वाढणे- भूक न लागणे , शय्यामूत्रता (अंथरुणात लघवी करणे) इ. तसेच स्रियांचे सर्व विकार, वंध्यत्व चिकित्सा , प्रसुतीपूर्व तपासणी, त्वचा विकार, सौंदर्योपचार, हृदयरोग, पोटाचे विकार पित्ताशयातील खडे, मुतखडा,शरीरावरील लहान-मोठ्या गाठी, मूळव्याध , भगंदर, फिशर, हर्निया, अपेंडिक्स, हायड्रोसिल, थॉयरॉईड च्या गाठीची शस्त्रक्रिया व मोतीबिंदू ऑपरेशन आल्प दरात उपलब्ध आहेत, त्याच प्रमाणे डोळे, कान, नाक, घसा यावरील उपचार व सल्ला मार्गदर्शन व आहारविषयक व योगविषयक मार्गदर्शन केले जाईल. आशा विविध व्याधींचे योग्य रोग निदान करण्यात येईल. निदान झालेल्या आजारावर आजारांवर तीन दिवसांची औषधे मोफत देण्यात येतील. चिकित्सा झालेल्या रुगणांना पुढील उपचारासाठी आंतररुग्ण विभागात मोफत रहाण्याची व जेवणाची सुविधा उपलब्ध असेल.

जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ . डी. वाय पाटील आयुर्वेद रुग्णालयाच्या वतिने करण्यात आले आहे.