वेहेरगाव येथील श्री एकवीरा देवीच्या श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची निवडणूक शांततेत पार

लोणावळा, दि.२७ (लोकमराठी) – महाराष्ट्रातील जागृत देवस्थान व कोळी आगरी सीकेपी अशा विविध समाजातील नागरिकांची कुलस्वामिनी म्हणून ओळख असणार्‍या वेहेरगाव येथील श्री एकवीरा देवीच्या श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची निवडणूक २६ फेब्रुवारी रोजी शांततेत पार पडली.

२६ फेब्रुवारी रोजी चार जागांसाठी मतदान झाले आहे. वेहेरगाव गावातील त्वेष्ट भक्तनिवास याठिकाणी सकाळी ९ ते सायंकाळी ४ दरम्यान ही मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली.

यावेळच्या निवडणुकीसाठीही मोठी चढाओढ असल्याने पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.परंतु श्री एकविरा विश्वस्त मंडळाच्या उमेदवारांनी संयमाने घेत ही निवडणूक शांततेत पार पाडत नवा पायंडा पाडला.

यामध्ये सागर मोहन देवकर व विकास काशिनाथ पडवळ यांनी बाजी मारली आहे. सागर देवकर यास ३३०तर विकास पडवळ ला ३०९ मते मिळाली. गुरव देशमुख परिवारातील मारुती देशमुख यांना ११० तर महेंद्र देशमुख २२ मते घेत विजयी झाले.

विश्वस्त मंडळाच्या चार जागांकरिता तब्बल २७ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या.त्यामध्ये पुजारी प्रतिनिधी म्हणून संजय गोविलकर, गुरव प्रतिनिधी म्हणून नवनाथ देशमुख व गावचे सरपंच या पदसिद्ध जागेवर अर्चना संदीप देवकर यांचा समावेश आहे.

या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुंबई विभागाचे धर्मदाय कार्यालयातील एस.एस.पारच यांनी काम पाहिले तर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम लोणावळा उपविभागीय पोलिस सत्यसाई कार्तिक यांच्या सुचनेनुसार लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ आणि त्यांचे सहकारी, वेहेरगावचे पोलिस पाटिल अनिल पडवळ यांनी केले.

सविस्तर निकाल खालीलप्रमाणे :

1) राघू त्रिंबक देशमुख व कोंडू बहिरु देशमुख तक्षिमेतील सदस्य पदाचे उमेदवारांना झालेले मतदान १२०पैकी ११५

अ) मारुती रामचंद्र देशमुख :- १०४ (विजयी) ब) विजय विठ्ठल देशमुख :- १०

क) अमेय विजय देशमुख :- ००

2) नथू दगडू देशमुख तक्षिमेतील सदस्य पदाचे उमेदवारांना

झालेले मतदान ३८ पैकी ३७ अ) महेंद्र अशोक देशमुख – २२ (विजयी)

ब) ऋषिकेश बाळु देशमुख – ००

क) भगवान नथू देशमुख – १४ 3) स्थानिक गावातील दोन भाविक सदस्य पदाचे निवडीसाठी

उमेदवारांना झालेले मतदान १२५३ पैकी १०६०

1) सागर मोहन देवकर ३३० (विजयी)

2) विकास काशिनाथ पडवळ – ३०९ (विजयी) 3) सोमनाथ रामभाऊ बोत्रे – १४५

4) युवराज शंकर पडवळ – २५७

5) श्रीमती रेशमा युवराज पडवळ – २५

6) शरद वसंत कुटे – ९

7) संजय भागोजी देवकर – ६

8) मंगेश विठ्ठल देशमुख – १२६

9) चंद्रकांत हावजी देवकर – २८८ 10) निलेश साहदू बोरकर – ८

11) संजय भागुजी देवकर – ३

12) अशोक वसंत कुटे – १९६ 13) विनोद मोहन देवकर – ३

14) निरंजन प्रदिप बोत्रे – ३४

15) मारुती राजाराम देवकर – ७९ 16) आकाश बबन माने – ०

17) सुनिल हुकाजी गायकवाड – १२५

18) मिलींद दत्तात्रेय बोत्रे -१

19) मनोहर सदाशीव पडवळ ९-

20) मधूकर राघु पडवळ – २

21) अनिकेत दशरथ देशमुख – १