मानव सुरक्षा सेवा संघाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी मच्छिंद्र राखपसरे यांची निवड

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्युज नेटवर्क

संगमनेर : महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात निर्भीडपणे काम करणाऱ्या मानव सुरक्षा सेवा संघ या संघटनेची बैठक माजी महसूल मंत्री काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये यशोधन कार्यालय संगमनेर येथे सपन्न झाली. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोलजी राखपसरे साहेबांनी संघटनेचे कार्य कसे चालते या संदर्भात मार्गदर्शन केले. 

कुठे अन्याय अत्याचार होत असेल किंवा कोणत्याही क्षेत्रातील अधिकारी आपल्याला त्रास देत असेलतर तात्काळ मानव सुरक्षा सेवा संघांच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधा असे जाहीरपणे त्यांनी आव्हान केले. आणि संघटनेचे महत्त्व पटवून दिले. जसे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बशीरभाई भुरे साहेब काम करतात असेच आपणही करावे. यावेळी यावेळी पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र राख पसरे यांची सर्वानुमते संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच त्यांना निवडीचे नियुक्तीपत्र आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते देण्यात आले.  

यावेळी आमदार थोरात यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संघटनेचे उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शब्बीर शेख, सचिव जावेद शेख तसेच मच्छिंद्र राखपसरे (पुणे जिल्हा प्रमुख), अतुल शिंगाडे (संघटक- पुणे जिल्हा ), विशाखा खलसे ( पुणे शहर महिला अध्यक्ष ), सुवर्णा मलघे ( संघटक- पिंपरी चिंचवड शहर ), प्रवीण घुगे (अध्यक्ष- संगमनेर तालुका ), नूतन पदाधिकारी पगडाल, नरसय्या पगडाल उपस्थित होते.

Join WhatsApp Group
Exit mobile version