पिंपळे सौदागरमधील महापालिका दवाखान्याचा विस्तार करा – विशाल जाधव

पिंपळे सौदागरमधील महापालिका दवाखान्याचा विस्तार करा - विशाल जाधव

पिंपळे सौदागर, ता. 30 : येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा दवाखाना रूग्ण संख्या विचारात घेता अपुरा पडत आहे. तोकड्या जागेमुळे कर्मचाऱ्यांसह रूग्णांचेही मोठे हाल होतात. त्यामुळे लवकरात लवकर या दवाखान्याचा विस्तार करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांनी केली आहे.

याबाबत जाधव यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपळे सौदागर, रहाटणी, पिंपळे गुरव भागातील जवळजवळ एक ते दिड लाख लोकसंख्या असलेल्या भागातुन लोक उपचार घेण्यासाठी या दवाखान्यात येतात. दररोज किमान १०० ते १५० रुग्ण ओपीडीची सेवा घेतात. संपुर्ण भागात राष्ट्रीय रूग्ण सेवकांचा कार्यक्रम राबविण्यात येतो. तसेच बालक लसीकरण मोहीमही यशस्वीपणे राबविण्यात येते. क्षयरोग तपासणी, निदान व उपचार त्याच ठिकाणी केले जातात. परिणामी रुग्ण संख्या रोजच वाढत असते. सर्व रुग्णांची आवश्यकतेनुसार रक्त तपासणी, ह्याच ठिकाणी उपलब्ध आहे. गरोदर माता तपासणी व प्रसृतीनंतर आरोग्य सेवेचेही काम ह्याच ठिकाणी उपलब्ध आहे. अश्या अनेक सोईसुविधायुक्त दवाखाना असल्याकारणाने सहाजिकच अतिभार व गैरसोईचा सामना रुग्णाबरोबर कर्मचारी वर्गासही भोगावा लागतो. तरी दवाखाना हा साधारणपणे ५०० स्क्वेअर फूट जागेमध्ये सुरु आहे. दवाखान्याची इमारत बहुमजली असुनसुद्धा त्याचा फायदा रूग्णांसाठी होत नाही. आदी बाबी आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्याचे काम स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

पिंपळे सौदागरमधील महापालिका दवाखान्याचा विस्तार करा - विशाल जाधव

पिंपळे सौदागर म्हणजे आयटीयन लोकाची लोकवस्ती म्हणून ओळखले जाणारे, झपाट्याने वाढणारा परिसर, कष्टकरी, होतकरू, गरजू लोकवस्तीचा परीसर. या ठिकाणी महापालिकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी व त्या भागातील जनसामान्यांच्या गरजा भागविण्यासाठी गेले कित्येक वर्षे प्रशासनाला जागे करण्याचा हट्टाहास सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांचा नेहमी असतो. पिंपळे सौदागर येथे महानगरपालिकेचा दवाखाना १९८६ ला स्थापना झाला. तेव्हापासून आजपर्यंत सुव्यवस्था सुरु आहे. दवाखान्यातील स्टाफ व सेवक वर्ग अतिशय नम्रपणे काम करतात. असे विशाल जाधव यांनी सांगितले.