
पुणे दि.२५ (लोकमराठी) – पुणे जिल्ह्यातील आंबे गावात वृद्ध दांपत्याला लक्ष्य करून घरात घुसून रात्रीच्या वेळी दरोडा टाकणाऱ्या चार अट्टल दरोडेखोरांना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संगमनेर तालुक्यातून अटक केली आहे.
रवींद्र भाऊसाहेब फड (वय ३० रा. दरेवाडी ता. संगमनेर जि. अ नगर), वैभव दिगंबर नागरे (वय २० रा.दरेवाडी ता. संगमनेर जि. अ नगर), अतिष बाळासाहेब बडवे (वय २३ रा. पिंपरी लौकी ता. संगमनेर जि. अ नगर, नंदकुमार पवार (वय २१ रा. दरेवाडी ता. संगमनेर जि. अ नगर) असे या अटक करण्यात आलेल्या अट्टल दरोडेखोरांची नावे आहेत.
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंचर पोस्टे गु.र.नं ६५/२०२३ भादवि कलम ३९२,३४ नुसार गुन्हा दाखल झाला होता.दिनांक ८/२/२०२३ रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंचर हद्दीत थोरांदळे येथील फिर्यादी नामे चिकणाबाई मिंडे वय वर्ष ७२ यांच्या घरात घुसून त्यांना व त्यांच्या पतीस मारहाण करून अंगावरील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम बळजबरीने काढून घेऊन पसार झाले होते.या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखे मार्फत तपास सुरू असतानाच दि.१६/२/२०२३ रोजी पारगाव पोलीस स्टेशन हद्दीत धामणी या गावात रात्री अकराच्या सुमारास गोविंद फगवंत जाधव वय वर्ष ८२ यांच्या घरात अनोळखी माणसांनी घुसून त्यांना व त्यांच्या पत्नीला मारहाण करून अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले सदर बाबत पारगाव पो स्टे येथे १४/२०२३ भादवि कलम ३९४,४५७,३४* नुसार गुन्हा दाखल केला होता. एका मागून एक झालेल्या दोन गंभीर प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते. दरम्यान पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सदर गुन्हा लवकरात लवकर उघड करून आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. गुन्ह्यांच्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी भेटी देऊन गुन्हे शाखेचे पथक तयार केले. पथकामध्ये सपोनि शेलार, पोहवा साबळे, पोहवा मोमीन, पोना वारे, पोकॉ अक्षय नवले, दगडू विरकर यांचा समावेश होता. पथकाने लागलीच आरोपींचा शोध सुरू केला. गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सीसीटिव्ही फुटेज आणि खबरऱ्यांमार्फत बातमी मिळाली की; सदर गुन्ह्यामध्ये दरेवाडी ता. संगमनेर जि. अ नगर येथील आकाश पांडुरंग फड नावाचा व्यक्ती असण्याची शक्यता आहे. मिळालेल्या बातमी नुसार गुन्हे शाखेच्या पथकाने दरेवाडी भागात सापळा लावून आकाश फड याला ताब्यात घेतले .त्याच्याकडे सदर गुन्ह्यांची चौकशी केली असता त्याने दोन्ही ठिकाणचे गुन्हे त्याचे इतर चार साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. यातील आरोपी रवींद्र भाऊसाहेब फड हा फरार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपी नंदकुमार पवार याला पारगाव पोलीस स्टेशन च्या ताब्यात व बाकीचे आरोपी मंचर पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहेत. आरोपींची वैदकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी मंचर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.महादेव शेलार, पोसई. गणेश जगदाळे, पोहवा. दिपक साबळे, पोहवा.राजू मोमीन, पो. ना. संदिप वारे, पो. कॉ. अक्षय नवले, पो. कॉ.निलेश सुपेकर, पो. कॉ.दगडू वीरकर यांनी केली आहे