
पुणे दि.२२ (लोकमराठी) – राजगड पोलीस ठाणेच्या हद्दीतील एटीएम मशीन फोडणारी टोळीला जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हेशाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे.
१)प्रणीत दयानंद गोसावी (वय २४ वर्षे, सध्या रा धाडगेमळा, अथर्व पेंटसन बिल्डींग, चाकण ता खेड जि पुणे मुळ रा चिंचणी ता खटाव सातारा) २)शुभम भाऊलाल नागपूरे (वय २२ वर्षे सध्या रा ज्ञानेश्वर कॉलनी, नानेकरवाडी, चाकण ता खेड जि पुणे मुळ रा आष्टी ता तुमसर जि भंडारा), ३) शुभम युवराज सरवदे (वय १९ वर्षे, रा यशवंत कॉलनी नानेकरवाडी, चाकण ता खेड जि पुणे, मुळ रा नाका डोंगरी, ता तुमसर जि भंडारा), ४) आकाश मोडक नागपुरे (वय २२ वर्षे, सध्या रा ज्ञानेश्वर कॉलनी, नाणेकरवाडी, चाकण ता खेड जि पुणे), ५) कार्तिक मुलचंद गोपाले ( वय २९ वर्षे, सध्या रा ज्ञानेश्वर कॉलनी, नाणेकरवाडी, चाकण ता खेड जि पुणे, मुळ रा आष्टी ता तुमसर जि भंडारा) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १६/०२/२०२३ रोजी पहाटेच्या वेळी राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील वेळू गावचे हद्दीत वेळू फाटा येथील सेंट्रल बैंक ऑफ इंडीया थे कॅश डिस्पेसर मशीन तीन अनोळखी इसमांनी ए.टी.एम. मशीनचे नुकसान करून चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. त्याबाबत राजगड पोलिस ठाणे येथे गु.रजि. नं. ७९१/२०२३ भा.दं.वि.क. ३८०, ५११, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे. गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने व नमुद टोळीस वेळीच न पकडल्यास त्यांचेकडून आणखी अशाप्रकारचे गुन्हे घडण्याची शक्यता असल्याने पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे ग्रामीण यांनी टोळी पकडण्याबाबत आदेशीत केलेले होते त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब डोले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स्था.गु.शा.पुणे ग्रामीण यांचे नियंत्रणाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि महादेव शेलार, पोसई प्रदीप चौधरी, पोसई गणेश जगदाळे, सहा फौज, प्रकाश वाघमारे, दिपक साबळे, अजित भुजबळ, राजू मोमीण, हेमंत विरोळे, पो.ना. अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, मंगेश भगत, तुषार भोईटे, संदिप वारे, पो. कॉ. दगडु विरकर, अक्षय नवले, निलेश सुपेकर यांचे एक पथक स्थापून त्यांचे मार्फतीने गुन्हयाचा समांतर तपास सुरू केला होता. गुन्हयाचा समांतर तपास चालू असताना आरोपींनी गुन्हा करतेवेळी वापरलेल्या संशयीत चारचाकी वाहनाचा सी. सी. टी. व्ही. फुटेजच्या आधारे शोध घेत असताना सदरचे वाहन पुणे शहराकडे आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संशयीत वाहन व आरोपींची खबऱ्यांमार्फत बातमी काढली असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की, गुन्हा हा प्रणीत गोसावी (रा. चाकण) याने त्याचे साथीदारांचे मदतीने केला असल्याची बातमी स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाला मिळाली होती प्रणीतला घाडगे मळा चाकण परीसरातून सापळा लावून त्याचेकडील व्हेंटो कंपनीचे चारचाकी वाहनासह ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने गुन्हा हा त्याचे साथीदार यांचेसह केला असल्याची माहिती दिली. त्यानुसार त्या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांचकडे चौकशी केली असता त्यांनी दि १८/०२/२०२३ रोजी डिसकळ ता खटाव जि सातारा येथील सोनाराचे दुकान फोडून चोरी केली असून त्याच गावातील टाटा कंपनीचे ए.टी.एम. फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले आहे. आरोपींना राजगड पोलीस स्टेशन चे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन करीत आहे.