धर्मनिरपेक्षतेचा वारसा जपणाऱ्या बोपखेलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

बोपखेल : स्वातंत्र दिनानिमित्त बोपखेलमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक पहायला मिळाले. विविधतेने नटलेला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा जपणारे देशातील सर्व जाती धर्मचे व पंथाचे लोक गेली अनेक वर्षे येथे गुण्यागोविंदाने राहतात. धर्मनिरपेक्षतेचा वारसा जपणाऱ्या या गावात ध्वजारोहण करण्यात आले. 

त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते भाग्यदेव घुले, अॅड. मुजिब सय्यद, नागुर साहेब, संतोष गायकवाड, नामदेव घुले, रोहीदास जोशी, दत्ता घुले, दत्तात्रय बाळु घुले व नागरिक व मुले उपस्थित होते.

भाग्यदेव घुले म्हणाले, सर्व राज्यातील लोकांचे सण तेवढेच आनंदाने बोपखेलमध्ये साजरी होतात, हेच वेगळेपण आहे. सर्व धर्मांचा आदर करणे हेच आमची संस्कृती आहे. 

Recent Posts