मध्यप्रदेशात आम आदमी पक्षाचा महापौर

मध्यप्रदेशात आम आदमी पक्षाचा महापौर

भोपाळ, ता १८ : दिल्ली, पंजाब नंतर आता इतर राज्यात आम आदमी पक्षाचा प्रभाव वाढताना दिसत आहे. मध्यप्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) एक महापौरपद जिंकले आहे.

राज्यातील ११ पैकी सहा ठिकाणी भाजपने महापौरपद जिंकले आहे. तर काँग्रेसला तीन ठिकाणी विजय मिळवला आहे. सिंगरौली येथील महापौरपदी आम आदमी पक्षाचा (Aap) उमेदवार विजयी झाला आहे. भाजपला इंदूर, बुऱ्हाणपूर, सतना, खंडवा, सागर तसेच उज्जैन येथे महापौरपदे जिंकता आली. काँग्रेसला ग्वाल्हेर, जबलपूर तसेच छिंदवाडा येथे महापौरपदी विजय मिळवता आला.

छिंदवाडा हा कमलनाथ यांचा बालेकिल्ला तेथे काँग्रेसने आपला प्रभाव राखला. ग्वाल्हेरमध्ये मात्र, भाजपला (BJP) धक्का बसला आहे. गेल्या वेळी काँग्रेसला (Congress) एकही महापौरपद जिंकला आले नव्हते. त्यातुलनेत त्यांची कामगिरी चांगली झाली आहे.