मोटार सायकल चोरी प्रकरणी आंतरजिल्हा टोळीतील नऊ जणांना अटक; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

पुणे दि.१० (लोकमराठी) – पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा विभागाने कारवाई करत मोटरसायकल चोरी करणाऱ्या अंतर जिल्हा टोळीच्या दोन म्होरक्यांसह एकूण नऊ सदस्यांना जेरबंद करत २९ मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत.

अमोल नवनाथ मधे (रा. वाघवाडी पोखरी ता पारनेर जि अहमदनगर), विजय संजय मधे (रा. निमदरी ता पारनेर जि अहमदनगर), संतोष उमेश मधे (रा. रा. केळेवाडी पोखरी पवळदरा ता. पारनेर जि अहमदनगर), संदिप सुभाष मधे, (रा. केळेवाडी), धरणाचे वर कातळमाळ ता संगमनेर,( जि. अहमदनगर) , विकास साहेबराव मधे (रा. पवळदरा मधेवस्ती पोखरी ता पारनेर जि अहमदनगर) , विजय विठ्ठल जाधव (रा. कुरकुंडी ता संगमनेर जि अहमदनगर), सुनील वामन मेंगाळ( रा. धरणमळई वाडी बोटा ता संगमनेर), भारत पोपट मेंगाळ (रा. गारोळे पठार ता संगमनेर जि अ नगर),मयुर गंगाराम मेंगाळ (रा आंबीदुमाला ता संगमनेर जि अ नगर) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; पुणे ग्रामीण जिल्हयातील मागील वर्षभरात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने सदरची बाब गांभीर्याने घेवून पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मोटार सायकल चोरीबाबत वैयक्तीक दृष्टया लक्ष देवून कारवाई करणेबाबत सुचना केल्या होत्या.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी पुणे ग्रामीण जिल्हयातील मोटार सायकल चोरीचा आढावा घेत मोटार सायकल चोरी करण्याची वेळ, निवडलेली ठिकाणे, चोरी करणेसाठी येणारे जाणारे मार्ग तसेच चोरटयांनी अवलंबलेली पद्धत याचा बारकाईने अभ्यास करत कारवाई साठी प्रथम पुणे-नाशिक रोडची निवड केली आणि एक पथक स्थापन केले, तपास पथकाला योग्य मार्गदर्शन तसेच तपास कौशल्य सांगून कारवाईचे आदेश दिले. जुन्नर विभागात स्थानिक गुन्हे शाखेचे काम करणारे सपोनि महादेव शेलार, पोहवा दिपक साबळे, पोना संदिप वारे, पोकों अक्षय नवले या पथेकाला मोटार सायकल चोरी करणारे आंतरजिल्हा टोळीची गोपनीय माहिती मिळाली. त्या माहितीचे आधारे कारवाई सुरू केली असता, कारवाईचे स्वरूप व त्याची व्याप्ती मोठी असल्याचे लक्षात येताच आणखी एक पथक तपासात तयार करणेत आले. दोन्ही तपास पथकाने अहमदनगर जिल्हयातील आंतरजिल्हा टोळीच्या मुख्य दोन म्होरक्यासह नऊ जणांना जांबुत फाटा परीसरातून ताब्यात घेत धडाकेबाज कारवाई केली आहे. पुणे ग्रामीण अहमदनगर, ठाणे ग्रामीण जिल्हयातील मोटार सायकल चोरीचे व घरफोडी चोरीचे असे एकूण २६ गुन्हे उघडकीस आणले असून एकूण दहा लाख रूपये किंमतीच्या २९ मोटार सायकल हस्तगत केल्या आहेत. चोरी गेलेल्या मोटार सायकल हया ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग तसेच नोकरदार लोकांच्या होत्या, त्यांच्या मोटार सायकल स्थागुशाचे पथकाने हस्तगत केल्याने तकारदार हे आनंदी झाले आहेत.

आरोपी अ.क. १ ते ५ यांना नारायणगाव पोस्टे येथे तपासकामी जमा करणेत आले असून आरोपी अक ६ ते ९ यांना ओतूर पोस्टे येथे जमा करणेत आलेले असून आरोपींकडून नारायणगाव पोस्टे ४, घोडेगाव पोस्टे ५. ३, जुन्नर पोस्टे ३, मंचर पोस्टे २ खेड पोस्टे २, रांजणगाव पोस्टे १ शिरूर पोस्टे १ अकोले पोस्टे २ आश्वी पोस्टे १. ओतूर पोस्टे लोणी पोस्टे १, टोकावडे पोस्टे १ असे एकूण २६ गुन्हे उघडकीस आले असून एकूण ३३ घटना उघडकीस आलेल्या आहेत.

सदरची कारवाई पुणे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे पुणे विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सपोनि महादेव शेलार, पोसई गणेश जगदाळे, सफौ. तुषार पंदारे, पोहवा दिपक साबळे, विक्रम तापकीर, हेमंत विरोळे, मंगेश थिगळे, राजू मोमीण जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, पोना संदिप वारे, पो.कों अक्षय नवले, चासफो मुकुंद कदम, चापोका अक्षय सुपे यांनी केली आहे.