मावळ येथे “सौभाग्यवती २०२३ ” खेळ रंगला महिलांचा तसेच सुषमा स्वराज ॲवार्ड कार्यक्रम उत्साहात संपन्न

मावळ, दि.१६ (लोकमराठी) – पुणे (ता.मावळ) येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भाजपा महिला आघाडी, भाजपा मावळ तालुका महिला अध्यक्षा सायली जितेंद्र बोत्रे व नाणे मावळ भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने “सौभाग्यवती २०२३ ” खेळ रंगला महिलांचा तसेच सुषमा स्वराज ॲवार्ड ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्‍घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, जिल्हा अध्यक्ष गणेशतात्या भेगडे तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे , दूध संघाचे डायरेक्टर बाळासाहेब नेवाळे, राजमाता जिजाऊ महिला मंचच्या अध्यक्षा सारिका संजय भेगडे, लोनावळा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधरजी पुजारी, बाळासाहेब घोटकुले यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महिलांना खेळाद्वारे माजी सभापती गुलाबकाका म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, भाजपा प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे, मा.जिल्हा परिषद सदस्य भाऊ गुंड, मिलिंद बोत्रे, प्रशांतअण्णा ढोरे, उपनगराध्यक्ष श्रीधरजी पुजारी, बाळासाहेब घोटकुले, नगरसेविका अर्चना म्हाळसकर, सारिका भिलारे, दिपाली मोरे, वडगाव महिला शहराध्यक्ष धनश्री भोंडवे, लोणावळा शहर अध्यक्ष योगिता कोकरे, नगरसेविका निलिमा दाभाडे, सरचिटणीस रजनी ठाकूर, नगरसेविका शोभा भेगडे, मा.उपसभापती दिपाली म्हाळसकर, राणी म्हाळसकर, वैशाली म्हाळसकर यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या.

खेळ रंगला महिलांचा या कार्यक्रमात सौभाग्यवती २०२३ च्या मानकरी ठरल्या वैष्णवी चंद्रकांत रसाळ यांना सोन्याचे मंगळसूत्र शिलाई मशीन व मानाची पैठणी देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच द्वितीय क्रमांक गंगुबाई चिंधु मराठे यांना सोन्याची नथनी शिलाई मशीन व मानाची पैठणी तृतीय क्रमांक सविता अनिल दाबणे चांदीचे पैंजण शिलाई मशीन मानाची पैठणी ,चतुर्थ क्रमांक अर्चना नवनाथ पडवळ चांदीचा छल्ला मानाची पैठणी व शिलाई मशीन पंचम क्रमांक रेखा दत्तात्रेय वारूडे चांदीची जोडवी शिलाई मशीन व मानाची पैठणी

उपस्थित महिला भगिनींकरिता लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते.

प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या संगीता मोहिते यांना इलेक्ट्रिक दोन चाकी गाडी देण्यात आली, द्वितीय क्रमांक उषा मधुकर पडवळ यांना फ्रिज देण्यात आला. तृतीय क्रमांक कविता दळवी यांना ३२ इंची एलईडी टीव्ही देण्यात आला. चतुर्थ क्रमांक सीता शिळवणे यांना पिठाची गिरणी देण्यात आली. कार्यक्रमामध्ये मुख्य आकर्षक महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध होण्याकरिता दहा शिलाई मशीनचे लकी ड्रॉ पद्धतीने वाटप करण्यात आले तसेच सर्व उपस्थित महिलांना भेटवस्तू देण्यात आले.

उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात येणारा सुषमा स्वराज ॲवार्ड आयुवेदाचार्य डॅा.मालविका तांबे, युवा कीर्तनकार ह भ प जयश्री येवले यांना प्रदान करण्यात आला.

खेळ रंगला महिलांचा या कार्यक्रमाचे सादर करते सुप्रसिद्ध निवेदक अभिनेते संदीप पाटील यांनी केले महिलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी विविध प्रकारचे खेळ मंचावरती घेतले याला महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाचे नियोजन महिला आघाडीच्या कार्यध्यक्षा सुमित्राताई जाधव ,कल्याणी ठाकर ,सिमा आहेर ,वैशाली ढोरे ,ज्योती काटकर ,अंजली कडु , ग्रामपंचायत सदस्य पुजा पडवळ ,योगीता पडवळ ,मंदा टाकळकर ,चंदा पिंगळे ,अश्विनी तिकोणे ,रोहिणी गाडे ,आशा जाधव ,शैला मुर्ह् ,सुजाता मुर्हे , सरपंच अश्विनीताई गुंड ,अनिता कडु ,प्रगती वरे ,निलम सुतार ,सुरेखा उंबरे ,वैदेही रणदिवे ,सारिका शिदें ,सारिका घोलप , सुप्रिया शेलार,अनिता सावले ,शिल्पा दळवी ,सुजाता शेलार ,निलम केदारी , सुप्रिया पडवळ ,तसेच वाकसई गण अध्यक्ष सचिन येवले कुसगाव गण अध्यक्ष शेखर दळवी नाणेमावळ सर्व पदाधिकारी यांनी केले होते.

भारतीय जनता पार्टी महिला आघाडी मावळ तालुका व तालुका अध्यक्ष सायली बोत्रे यांच्या वतीने शिळाटणे येथिल शिवभक्त अपघातात जखमी झाले त्यांच्या उपचाराकरिता एक लाख रुपयाची मदत जाहीर करण्यात आली.

Join WhatsApp Group
Exit mobile version