समाजाची भावी पिढी घडवणारा शिक्षक सुख-सुविधांपासून वंचित

समाजाची भावी पिढी घडवणारा शिक्षक सुख-सुविधांपासून वंचित 

सीमा किरण मोहिते

आज ५ सप्टेंबर शिक्षक दिन विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकवर्गविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आजच्या दिवशी आपल्याला जगात आणणाऱ्या आई-वडिलांपासून ते आपला हात हातात धरून धूळपाटीवर श्री गणेशा काढायला शिकवणाऱ्या ते आपल्या शालेय जीवनाची इमारत पूर्ण उभी करणाऱ्या अशा अनेक विवध रूपात आपल्या आयुष्यात येणाऱ्या शिक्षकवर्गाविषयी आदर व्यक्त करण्याचा दिवस.

भारताचे भविष्य वर्गाच्या चार भिंतीत आकारास येत असते. घर हे मुलाच्या जीवनातील पहिली शाळा आई हा पहिला गुरु जीवनातील अनेक कटू गोड प्रसंगांना सामोरे जाण्याचे मार्गदर्शन करणारी आई असते नंतर मूल शाळेतील शिक्षकाच्या सहवासात येते. येथे त्याची व्यक्तिमत्व विकासास येते.

प्राचीन काळी गुरुकुल शिक्षण पद्धती अस्तित्वात होती. गुरुच्या घरी शिक्षण घेण्यास जावे लागत असे. गुरुगृही स्वतःची कामे स्वतः करावी लागत होती. गुरुना शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरुदक्षिणा द्यावी लागत असे. आजच्या शिक्षण पद्धतीत खूपच आमूलाग्र बदल घडवून आलेले आहेत. अभ्यास केंद्रित असणाऱ्या शिक्षण व्यवस्थेचे रूपांतर विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीत झालेले आहे.

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा आजच जन्मदिवस तमाम देशभरात शिक्षक दिन साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन हे पेशाने शिक्षक होते. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा दिवस देशभरात साजरा केला जातो.

सूक्ष्मपणे पाहायचे ठरवले तर आजच्या दिवशी शिक्षकवर्गविषयी ओथंबून वाहणारा आदर पुढच्या शिक्षक दिनापर्यंत तरी टिकतो का? छडी छमछम चालवण्याचा हात शिक्षण आयोग शिक्षण पद्धती विद्यार्थी वर्गाचा आतातायीपणा यांनी बांधले गेले आहेत. विद्यार्थी वर्ग म्हणजे एक प्रकारे समाजाची भावी पिढी घडवणारे शिक्षकांना पुरेसे मानधन मिळाले पाहिजे. आजच्या परिस्थितीत विनाअनुदानित तत्त्वावर अनेक शिक्षक काम करत आहेत. तर काय शिक्षक सकाळी शाळा आणि दुपारच्या वेळेत इतरत्र काम करताना दिसत आहेत. शिक्षकांना शिकवण्याचे काम करावे तर लागते पण इतर अवांतर कामाचा बोजा पण शिक्षकावर पडत आहे.

शिक्षण पद्धतीत शिक्षक वर्गाचे दोन गट पडतात एक पूर्णवेळ आणि दुसरा अर्धवेळ. पूर्णवेळ शिक्षकांसाठी देखील विद्यार्थी जेवढा फ्री असतो. तेवढाच अर्धवेळ शिक्षकासाठी देखील महत्वाचा असतो. अर्धवेळ वाले एक दिवस पूर्ण वेळेवर जाण्याचा येईल म्हणून राबवत असतात बऱ्याचदा वृत्तपत्रात कंत्राटी पद्धतीवर राहणारे शिक्षकांच्या आत्महत्या यासारख्या बातम्या येत असतात. मन विषन्न होते हाच का तो विद्यार्थी घडवणारे शिक्षक? तोच जर असा हताश होत असेल समाजाची प्रगतीची मोट बांधण्याचे स्वप्न साकारल्याची भाषा करणारे आपण फक्त बघायचीच भूमिका घ्यायची का? शिक्षक जर सुखी समाधानी असेल, त्याला त्याच्या नोकरीची हमी असेल तर तो ज्ञानदानाचे काम पूर्ण झोकून देऊन करू शकेल.

नुकताच शिक्षकांना मिळणाऱ्या सुविधांचा मुद्दा गाजतो आहे. पण विचार करायला गेल्यास दोष कोणा एकाचां नाही. शिक्षकांना त्यांचे काम पूर्ण करण्यास बऱ्याच अडचणी येतात, नियमाची चाकूरी आडवी येते. जागतिक स्तरावर भारताची मान उंचवणारे डिसले गुरुजी तमाम शिक्षकांसाठी अभिमानाची बाब. पूर्ण पद्धतीत बदल करावे लागणार आहेत. कोणत्याही गोष्टीवर टीका करणे सोपे असते, पण प्रत्यक्षात त्या परिस्थितीचा सामना करताना कसोटी लागते. अशावेळी “जावे त्यांच्या वंशां तेव्हा कळे” या म्हणीच्या आठवण येते.

शिक्षकावर विद्यार्थ्यांनी कौतुकाच्या वर्षात शिक्षक दिनी करताना त्यांच्या शिकवणुकीचा अपमान होऊ नये, असे वर्तन ठेवल्यास शिक्षकांचा गौरव दिन केल्यासारखे होईल.