
पुणे, दि. ७ मार्च २०२३ : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने (MPYC) काँग्रेस संघटन बळकट करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांच्या प्रभारींची नव्याने नियुक्ती केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांच्याकडे धुळे जिल्ह्याची (ग्रामीण) जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
चंद्रशेखर जाधव (Chandrashekhar Jadhav) यांनी केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणांवर नेहमीच टिका केली असून विविध प्रकारची आंदोलने केली आहेत. त्यांच्यावर आता धुळे जिल्हा ग्रामीणची प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांच्यावर टाकलेली ही जबाबदारी ते समर्थपणे सांभाळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून या निवडीबद्दल त्यांनी प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत, प्रदेश प्रभारी मितेंद्र दर्शनसिंग, सह प्रभारी प्रदीप सिंधव, सोशल मीडिया प्रदेश प्रभारी झीनत सबरीन व सर्व प्रदेश उपाध्यक्षांचे आभार मानले.
याबाबत चंद्रशेखर जाधव म्हणाले की, ” आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या श्रेष्ठीनी धुळे जिल्हा (ग्रामीण) प्रभारी म्हणून एक नवीन जबाबदारी दिली. गतवर्षी आजच्या दिवशी युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीमध्ये जिल्हा उपाध्यक्ष पदी निवडून आलो, आणि गेल्याच वर्षी प्रदेश सचिव पदी निवड देखील झाली. २०१६ पासून युवक काँग्रेसच्या माध्यमातून संघटनेचे काम सुरु केले. विचारधारेशी बांधिलकी, शीर्ष नेतृत्वाविषयी असणारी निष्ठा आणि सहकारी आणि मित्रपरिवारांची असणारी अमूल्य साथ, याच्या जिवावर कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना संघटनेने आपल्यावर विश्वास ठेवला हे संघटनेचे मोठेपण आहे. “
जाधव पुढे म्हणाले की, ” पिंपरी-चिंचवड सारख्या प्रतिकूल भागात कार्य करणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीवर काँग्रेसच हात ठेऊ शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. माझी निवड प्रातिनिधिक असून माझ्या सहकारी, मैत्री यांची ती खरी निवड आहे. आगामी काळात काँग्रेसची विचारधारा तळागाळापर्यंत पोहचविण्याचे कार्य आम्ही जोमाने करणार आहोत. भारतावर भाजपारूपी आलेले हे संकट दूर करून भारतात पुन्हा एकदा चैतन्याचे वातावरण निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. ” असा ठाम विश्वास चंद्रशेखर जाधव यांनी व्यक्त केले आहे.