Tag: भाजप

भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानं पत्रकाराला घरात घुसून मारहाण
ताज्या घडामोडी, मोठी बातमी, राष्ट्रीय

भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानं पत्रकाराला घरात घुसून मारहाण

आगरताळा : त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट केल्यानं एका पत्रकारावर हल्ला झाला आहे. बिप्लव देव यांच्यावर टीका करणारा व्हिडिओ फेसबुकवर टाकल्यानं पत्रकाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. जखमी पत्रकारावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहेत. त्रिपुरातल्या स्थानिक माध्यमांनी कोरोना काळातल्या असुविधांच्या बातम्या प्रसारित केल्या होत्या. त्याबद्दल मुख्यमंत्री देव यांनी एका कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली होती. माध्यमांना माफ करणार नाही, असं विधान त्यांनी केलं होतं. त्यानंतर एका पत्रकारानं त्यांच्यावर टीका केली होती. त्याच पत्रकाराला मारहाण झाली आहे. https://twitter.com/ndtv/status/1305210425336709126?s=19 ...
खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर?
मोठी बातमी, राजकारण

खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर?

मुंबई (लोकमराठी) : साताऱ्याचे खासदार उदयनराजेंच्या भेटी नंतर मुख्यमंत्र्यांकडून शिवेंद्रराजेंना भेटीचे निमंत्रण देण्यात आले असून शिवेंद्रराजे वर्षावर दाखल झाले आहेत. उदयनराजेंच्या उपद्रवाचे कारण देत काही दिवसांपूर्वी शिवेंद्रराजंनी राष्ट्रवादी काँग्रेसला राम-राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. उदयनराजे आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या भेटीत उदयनराजेंच्या राजीनाम्यानंतर विधानसभा आणि लोकसभेची पोट निवडणूक एकत्रित घेण्याची मागणी उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे सांगण्यात येत आहे. उदयनराजेंचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीनही राजेंना गमावणार हे जवळपास निश्चित आहे. दरम्यान, शिवेंद्रराजेंनी याआधीच भाजपमध्ये प्रवेश केला असून रामराजे नाईक निंबाळकरही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असल्याचे बोलेले जात आहे. वर्षावरील झालेल्या बैठकीनंत...