Tag: लोक मराठी

कांदा व्यापाऱ्याची ४२ लाखाची फसवणूक
महाराष्ट्र

कांदा व्यापाऱ्याची ४२ लाखाची फसवणूक

सोलापूर, दि. २० (लोकमराठी) : सोलापूरातील कांदा व्यापारी उस्मान अब्दूल गफुर बागवान (वय ५१, रा. तेलंगी पाच्छा पेठ, सोलापूर) यांची ४२ लाख २३ हजार ९३९ रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यांच्याकडून कांदा घेवून ठरलेल्या भावापेक्षा कमी पैसे दिले. थकीत रक्कम न दिल्याने मिरासाब आणि सिराज (रा. जिना मक्कल, तामीळनाडू) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बागवान यांचा कांदा विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी शेतकऱ्याकडून घेतलेला कांदा हे मिरासास आणि सिराज यांच्याकडे जुना पुना नाका येथे ट्रकने तामीळनाडू येथे पाठवला होता. ओळख असल्यामुळे बागवान हे मिरासाब आणि सिराज यांच्यासोबत व्यवहार करित होते. सुरवातीला काही दिवस व्यवहार व्यवस्थित झाला. त्यानंतर मात्र मिरासाब आणि सिराज या दोघांनी ठरलेल्या भावापेक्षा कमी पैसे दिले. उर्वरित रक्कम नंतर देतो म्हणून टाळाटाळ केली. अद्यापर्यंत थकीत रक्कम दिली नाही. बागवान यां...