Tag: Jagdish kabare

सुशिक्षित की फक्त शिक्षित? – जेट जगदीश
विशेष लेख

सुशिक्षित की फक्त शिक्षित? – जेट जगदीश

आज साक्षरतेचे प्रमाण वाढलेले आहे असं म्हणतात. आपल्या लक्षात येईल की, आपण साक्षर जरूर आहोत; पण अडाणी सुशिक्षित आहोत. वैज्ञानिक दृष्टीकोणाच्या अभावामुळे भाज्याफळे धुतल्यानंतरचे आणि स्वयंपाक घरातील भांडी विसळलेले पाणी पिण्यायोग्य नसले तरी झाडांना पोषक असते; ह्याची जाण नसल्यामुळे असे पाणी झाडांना देणे म्हणजे झाडांना निसत्व करणे आहे असे समजले जाते. ते पाणी डास वाढीस कारणीभूत ठरते, या समजापोटी सोसायटीतील शिक्षित मंडळी सोसायटीच्या आवारातील झाडांना ते पाणी घालण्यास विरोध करतात. विद्युत निर्मितीसाठी पाण्याची गतिज ऊर्जा वापरून टरबाईन फिरवले जातात आणि नंतर जे पाणी बाहेर पडते त्या पाण्यातील ऊर्जा काढून घेतल्यामुळे ते उर्जाहीन पाणी शेतीला देणे किंवा झाडाला देणे उपयोगाचे नाही, असे समजणे जेवढे हास्यास्पद तेवढेच सोसायटीमधील झाडांना भांडी विसळल्यानंतरचे, तांदूळ वा भाज्याफळे धुतल्यानंतरचे पाणी...
राहुल गांधींचे काय चुकले? –जेट जगदीश
विशेष लेख

राहुल गांधींचे काय चुकले? –जेट जगदीश

राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या टीकेवरून वाद निर्माण करून महाराष्ट्रात भाजपेईंनी मोठ्या प्रमाणात राहुल गांधींना 'जोडे मारो' (Bharat Jodo Yatra) कार्यक्रमही राबवला. या कार्यक्रमासंबंधी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यात आंदोलनकर्तीने राहुल गांधींना (Rahul Gandhi) जोडे मारण्याच्या ऐवजी सावरकरांवरच जोडे मारण्यासाठी हात उगारला होता असे हास्यास्पद चित्र दिसले. बरे तर बरे, बाकीच्या कार्यकर्त्यांनी तिला ताबडतोब अडवले म्हणून. नाहीतर बिचाऱ्या सावरकरांची काही धडगत नव्हती. त्यांनाच चपलांचा मार बसला असता. याचा अर्थ भाजपने सावरकर आणि राहुल गांधी यांना ओळखता न येणारे भाडोत्रीआंदोलनकर्ते मागवले होते की काय? दुसरे म्हणजे सावरकरांच्या (V D Savarkar) विरोधात मोठ्या प्रमाणात जाहीरपणे वक्तव्य करणे केव्हा सुरू झाले याबद्दल भाजपने जरूर चिंतन करायला हवे. 2014 पूर्वी सावरकरांविषयी अशा पद्धती...
पुरुष मर्द आणि स्त्री नाजूक? — जेट जगदीश 
विशेष लेख, मनोरंजन, मोठी बातमी

पुरुष मर्द आणि स्त्री नाजूक? — जेट जगदीश

'हर हर महादेव' हा (Har Har Mahadev 2022) चित्रपट म्हणजे एकूण सगळा विनोदच आहे. पण ते तसेच सोडून देऊन चालणार नाही. कारण या चित्रपटाचे निर्माते हे हिंदुत्ववादाने भारलेले धर्मांध आहेत आणि नवीन पिढीमध्ये आपल्या सोयीचा इतिहास लिहून चुकीचा संस्कार रुजवण्यात हातभार लावणारे आहेत. त्यामुळे त्यांना योग्य वेळी धडा शिकवलाच पाहिजे. पण या चित्रपटात मांजरेकरचा मुलगा कोवळा दिसतो म्हणून त्याची खिल्ली उडवणे मात्र योग्य नाही. कारण 'पुरुष म्हणजे मर्द' अशी जी एकूण पुरुषाची प्रतिमा तयार केली गेलेली आहे तीच मुळात चुकीची आहे. आज आपण अशा चुकीच्या कल्पनांमुळे कोवळ्या दिसणाऱ्या पुरुषाची खिल्ली उडवतो, हे तर त्याहूनही असंस्कृतपणाचे लक्षण आहे. एकूण जगभर पुरुषसत्ताक अवस्था घट्ट रुजवताना स्त्री आणि पुरुषांना विशिष्ट चौकटीत अडकवले गेले आहे. कारण माणूस जेव्हा शेती करू लागला आणि एका जागी स्थिर झाला तेव्हा स्त्रीला बा...
3 जानेवारी: सावित्रीबाई फुले जन्मदिन – जगदीश काबरे
विशेष लेख

3 जानेवारी: सावित्रीबाई फुले जन्मदिन – जगदीश काबरे

सावित्रीबाई फुलेंनी स्त्रीयांना दाखवलेला शिक्षणाचा मार्ग आणि स्वातंत्र्याचा कानमंत्र यामुळे त्यांचं जगणं बदलेल, शिक्षणामुळे त्या विचार करू लागतील, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतील, स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला लागतील,एवढंच नाहीतर या समाजात त्यांना पुरूषांच्या बरोबरीनं स्थान मिळेल अशी स्वप्ने गेली काही वर्षे आपण पहात आहोत. पण… तरीही वर्तमानपत्रांतून रोज तिच्यावरच्या वेगवेगळ्या अत्याचाराच्या बातम्या येताहेत. यावरून हेच सिध्द होतं की, अजुनही स्त्रीला केवळ मादी समजणाऱ्या समाजाची मानसिकता बदललेली नाही. पुरूषाची मानसिकता ज्या प्रमाणात शिक्षणामुळे बदलायला हवी होती त्या प्रमाणात बदलली नाही, हे सत्य आहेच, पण स्त्रीची मानसिकता तरी कुठे बदलली आहे? स्वातंत्र्याचा खरा अर्थ तिला कळला आहे का? परंपरा आणि संस्कृतीचा नेमका काय अर्थ लावताहेत त्या? आज कार्पोरेट क्षेत्रात लिलया वावरणारी स्त्री जेव्हा मार्...
अफवा पसरवणाऱ्या पोथ्या – जेट जगदीश
विशेष लेख

अफवा पसरवणाऱ्या पोथ्या – जेट जगदीश

जेट जगदीश अफवा पसरवणे जर गुन्हा आहे, तर व्रत आणि उपवासाच्या ज्या पोथ्या आहेत त्यातील खोटा आशावाद पसरवणाऱ्या भाकड कथा या अफवा नाहीत का? सत्यनारायण कथा, लक्ष्मीव्रत कथा, संतोषी माता व्रत कथा, सोळा सोमवार, सोळा गुरुवार, सोळा शुक्रवार च्या पोथ्या अफवा नाहीत का? कारण त्यात सांगितल्याप्रमाणे भक्तांच्या मनोकामना कधीच पुऱ्या झालेल्या आजतागायत दिसल्या नाहीत. मग ह्या पोथ्या लिहीणाऱ्या लेखकांनी अफवा पसरवण्याचा गुन्हा केला नाही काय? पोथी वाचणार्‍या भक्तांकडे क्वचितच धनधान्य, समृद्धी आली असेल. पण पोथी न वाचणाऱ्या या प्रकाशकांनी धर्माच्या नावाखाली पोथीच्या आधारे कर्मकांड करणाऱ्या ब्राह्मणाने मात्र खोऱ्याने पैसे ओढून स्वतःचे मात्र कल्याण केले! या पोथ्यातील कथांना खरे समजल्यामुळे प्रत्यक्षात नरबळी दिले गेले आणि अनेक भक्तांनी ही व्रते वा पूजा केल्यामुळे मिळणाऱ्या मोक्षाच्या अफवां...