शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे ‘न्याय मशाल’ अभियान सुरू
लोकसभा निवडणूक प्रचारात न्यायपत्राचा काँग्रेसकडून प्रसार
चिंचवड दि. २८ : मावळ लोकसभा मतदारसंघाच्या आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पिंपरी चिंचवड शहरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी "न्याय मशाल" आणि "न्याय तुतारी" अभियान मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात राबवणार असल्याचे कळवले आहे.
या अभियानांतर्गत काँग्रेस पक्षाने दिलेल्या न्यायपत्र या जाहीरनाम्याचा प्रसार आणि उमेदवारांचा निवडणूक प्रचार करत दोन्ही लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी फिरत आहेत.
या अंतर्गत काँग्रेस पक्षाने दिलेल्या सामाजिक भागीदारी, युवक, महिला, श्रमिक, शेतकरी या घटकांसाठी कल्याणकारी संकल्प रचताना कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई अशा दोन यात्रा भारत जोडो आणि न्याय यात्रा करत राहुल गांधींनी जनतेची मते ल...