Tag: Nationalist Congress Party

समाजातील पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी लीगल सेलने काम करावे – सचिन साठे
पिंपरी चिंचवड

समाजातील पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी लीगल सेलने काम करावे – सचिन साठे

निरपेक्षपणे काम करणाऱ्यांना काँग्रेसमध्ये न्याय मिळतो पिंपरी, ता. १२ : न्याय व्यवस्थेवरील विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी अन्यायग्रस्त पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी लीगल सेलने काम करावे असे आवाहन काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सचिन साठे यांनी केले. तसेच काँग्रेस पक्षात निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निश्चितच न्याय मिळतो असेही सचिन साठे म्हणाले. रविवारी (ता. १२ सप्टेंबर) आकुर्डी येथे शहर काँग्रेसच्या लिगल सेलचे अध्यक्ष ॲड. अनिरुद्ध कांबळे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात साठे बोलत होते. https://youtu.be/wApi38QxtFc यावेळी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष गिरीजा कुदळे, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, ॲड. अनिरुद्ध कांबळे, मयूर जयस्वाल, मकरध्वज यादव, प्रतिभा कांबळे, बाबा बनसोडे, हिरामण खवळे, विशाल कसबे; चंद्रशेखर जाधव, संदेश बोर्डे आदी उपस्थित ह...
नदीपात्रातील कचरा उचला अन्यथा आयुक्तांच्या कार्यालयात कचरा टाकू – विशाल वाकडकर
पिंपरी चिंचवड

नदीपात्रातील कचरा उचला अन्यथा आयुक्तांच्या कार्यालयात कचरा टाकू – विशाल वाकडकर

पिंपरी-चिंचवड, (लोकमराठी) : देहुरोड – कात्रज बाह्यवळण महामार्गावर रावेत उड्डाणपूलाखाली नदिपात्रात मागील अनेक दिवसांपासून कचरा टाकण्यात येत आहे. तो कचरा पिंपरी चिंचवड मनपा प्रशासनाच्या आरोग्य विभागाने ताबडतोब उचलावा व कचरा टाकणा-या संबधित ठेकेदारांवर किंवा जबाबदार असणा-या व्यक्तींवर प्रशासनाने गुन्हे दाखल करावेत, अन्यथा पुढील दोन दिवसात तो कचरा आयुक्तांच्या कार्यालयात आणून टाकू असा इशारा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या पत्रात दिला आहे. रावेत जलउपसा केंद्राच्या वरच्या टप्प्यात हा कचरा टाकण्यात येत आहे. त्यातून दुर्गंधीयुक्त अस्वच्छ पाणी नदीतील पाण्यात मिसळत आहे. तेच दुषित पाणी रावेत जलउपसा केंद्रातून शहरातील 25 लाखांहून जास्त लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यासाठी उचलले जाते. या पाण्यात कच-यातील हानीकारक जीवजंतू आण...
महाराष्ट्र हित महत्त्वाचे! जनमताचा आदर व्हायला हवा!
विशेष लेख

महाराष्ट्र हित महत्त्वाचे! जनमताचा आदर व्हायला हवा!

काँग्रेसचे तरुण नेते शिवसेनेसोबत सत्तेसाठी उत्सुक! शीतल करदेकर काँग्रेस पक्षाचे मुंबईचे माजी अध्यक्ष संजय निरुपम हे काँग्रेस पक्षासाठी हितकारक कधी होते. याचा शोध आणि बोध पक्षाने घेण्याची वेळ आली आहे. बदलत्या राजकीय समीकरणात अनेक पक्ष प्रादेशिक पातळीवर सहकार्य करून सत्ता स्थापन करत आहेत, त्यात भारतीय जनता पार्टी पक्ष आघाडीवर आहे. सत्ता मिळवणे आणि मिळवलेल्या सत्तेचा लोकहितासाठी उपयोग करणे हा उद्देश मुख्यता असायला हवा. मात्र, मागील अनेक वर्षात जुनी राजकारण बदलून व्यक्तिकेंद्री राजकारणाला खतपाणी मिळाले आहे. विविध पक्ष, त्यात विविध गट आणि सत्ताकेंद्रे तयार झालीत. विविध प्रांतात अनेक वतनदार तयार झाले. शिक्षण महर्षी, कार्यसम्राट, कारखानदार आणि आता व्यापारी वाढले! मिळालेल्या सत्तेचा गैरवापर न करता जनतेचे पालक म्हणून काम करणे, हाच मुख्य उद्देश असायला हवा हे बहुसंख्य राजकारणी व...
तोपर्यंत फेटा बांधणार नाही; राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंचा निर्धार
राजकारण

तोपर्यंत फेटा बांधणार नाही; राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंचा निर्धार

बीड, ता. २५ (लोकमराठी) : बीड जिल्ह्यातील परळी आणि केजमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आमदार निवडून येत नाही, तोपर्यंत बीड जिल्ह्यात आल्यावर फेटा बांधणार नाही, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची राज्यात शिवस्वराज्य यात्रा सुरु असून या यात्रेनिमित्त आंबेजोगाई येथे आयोजित सभेत खासदार कोल्हे यांनी होते. शिवस्वराज्य यात्रा परळीहून अंबाजोगाईला आली असता, परळी आणि केज मतदारसंघात आमचे आमदार जोपर्यंत निवडून येणार नाहीत तोपर्यंत फेटा बांधणार नाही. तसेच जेव्हा आमदार होतील त्याचवेळी या व्यासपीठावर येऊन फेटा बांधेन, असे विधान खासदार अमोल कोल्हे यांनी आयोजित सभेत केले. राष्ट्रवादीच्या आमदार नमिता मुंदडा यांनी फेटा बांधण्यास घेतला असता त्यास नकार देत कोल्हे यांनी वरील निर्धार व्यक्त केला. दरम्यान...