Tag: SM Joshi College

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती साजरी 
पुणे

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती साजरी

हडपसर, 23 सप्टेंबर 2024 (प्रतिनिधी) - एस. एम. जोशी कॉलेज व साधना शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक, प्रशासकीय अधिकारी व 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हडपसरचे लोकप्रिय आमदार व रयत शिक्षण संस्थेचे, पश्चिम विभागीय चेअरमन चेतन (दादा) तुपे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप (आबा) तुपे व महाविद्यालय विकास समिती सदस्य अमर (आबा) तुपे यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137 व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक विभागाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा, कर्मवीर संवादमाला, ...
छत्रपती संभाजी महाराज भारतीय राष्ट्रीय उत्कृष्ट समाज सेवा राज्यस्तरीय पुरस्कार शिवशाहीर विजय तनपुरे महाराज यांना जाहिर
पुणे, शैक्षणिक, सामाजिक, साहित्य

छत्रपती संभाजी महाराज भारतीय राष्ट्रीय उत्कृष्ट समाज सेवा राज्यस्तरीय पुरस्कार शिवशाहीर विजय तनपुरे महाराज यांना जाहिर

राहुरी, दि.२० (लोकमराठी) - छावा प्रतिष्ठान मुंबई महाराष्ट्र राज्य यांचा राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज भारतीय राष्ट्रीय उत्कृष्ट समाज सेवा पुरस्कार राहुरी येथील शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांना जाहीर करण्यात आला. छावा प्रतिष्ठान मुंबई महाराष्ट्र राज्य समितीचे कार्याध्यक्ष श्रीयुत वस्ताद अमित गुंडाकुश यांनी पत्राद्वारे कळविले आहे. हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्रातील फक्त दोनच व्यक्तींना दिला जातो. दि. २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वा. वाजता मराठी साहित्नय संघ सभागृह नवी मुंबई येथे एका समारंभात निवृत्त ब्रिगेडियर मेजर सुधीर सावंत व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. शिवशाहीर डॉ विजय तनपुरे यांनी शाहिरीतून व कीर्तनातून शिवरायांचे कार्य महाराष्ट्रात देशात तसेच परदेशातही पोहोचवले आहे. तसेच सिन्नर येथे अंध अपंग निराधार इत्यादी समाजातील दुर्लक्षिलेल्या घट...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये Preparation of Herbal Cosmetics and Related Cosmetic Products या विषयावर वर्कशॉपचे आयोजन 
शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये Preparation of Herbal Cosmetics and Related Cosmetic Products या विषयावर वर्कशॉपचे आयोजन

हडपसर, ता. १७ ऑगस्ट २०२३ (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमधील वनस्पतीशास्त्र विभागामार्फत Preparation of Herbal Cosmetics and Related Cosmetic Products या विषयावर वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. या वर्कशॉपच्या अंतर्गत मुलांना कॉस्मॅटिकस मध्ये वापरले जाणारे २० हुन अधिक वनस्पतींची माहिती आणि त्याचा उपयोग सांगण्यात आला. भारत देशात औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग आपण आरोग्य टिकवण्याकरता आणि अगदी स्वस्तात रोग बरे करण्याकरता करू शकतो. आपल्या परिसरातील काही झाडांना तर खरोखर हिरव्या देवता म्हणता येईल. आता आपण त्यातल्या महत्त्वाच्या औषधी वनस्पती बद्दल माहिती आणि दैनंदिन जीवनामध्ये कसा उपयोग करता येईल याचे प्रशिक्षण वर्कशॉप मध्ये देण्यात आले. कोरफड, हळद, चंदन, यापासून साबण बनवण्याचे प्रशिक्षण त्याचबरोबर शिककाई पासून शाम्पू बनवण्याचे प्रशिक...
प्रादेशिक मानसिक रुग्णालयास एस. एम. जोशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भेट 
शैक्षणिक, पुणे

प्रादेशिक मानसिक रुग्णालयास एस. एम. जोशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भेट

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी महाविदयालयातील मानसशास्त्र विभागाचे विद्यार्थी व शिक्षकांनी प्रादेशिक मानसिक रुग्णालय येरवडा येथे भेट दिली. सदर भेटीमध्ये सर्व विदयार्थ्यांना रुग्णालयाची परिपूर्ण माहिती रुग्णालयाचे सामाजिक अधिकारी मोहन बनसोडे यांनी दिली. रुग्णालयात रुग्ण दाखल करण्याची प्रक्रिया, नवीन कायद्या संदर्भातील माहिती, तसेच रुग्णांची दैनंदिन दिनचर्या याविषयी प्रात्यक्षिक दाखविले. रुग्णांसाठी उपचार पध्दती कोणत्या स्वरूपात दिल्या जातात उदा: डान्स थेरपी, म्युझिक थेरपी, स्पंज थेरपी याची माहीती दिली. तसेच त्या रुग्णांना उपचार पद्धती कशा प्रकारे उपयोगी पडते यांची माहीती दिली. रुग्णालयामध्ये असलेल्या महिला रुग्ण व पुरुष रुग्ण यांचे विकृती संदर्भात : वर्तन कसे होते. यांची माहिती दिली. त्यांना दिला जाणारा आहार आणि त्यांचे वेळापत्रक यांची माहिती दिली. ...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सेवापुर्ती सत्कार समारंभ संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सेवापुर्ती सत्कार समारंभ संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. महेंद्र पाटील व कार्यालयीन सेवक श्री. अंकुश कारकर यांच्या सेवापुर्ती सत्कार समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, उपाध्यक्ष मा. आमदार चेतन (दादा) तुपे पाटील यांनी दोन्ही सत्कारमूर्ती यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, जनरल बॉडी सदस्य मा. दिलीप (आबा) तुपे यांनी दोन्ही सत्कारमूर्तीना शुभेच्छा दिल्या. भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.महेंद्र पाटील व कार्यालयीन सेवक श्री.अंकुश कारकर यांनी नोकरीला नोकरी न समजता रयत शिक्षण संस्थेत सेवा म्हणून काम केले. हे रयतेचे दोन्ही गुणी सेवक असल्याचे गौरवउद्गार प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी काढले. याप्रसंगी अनंतराव पवार कॉलेज पिरंगुट येथील प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी म्हणाल्या विद...
बेटी बचाओ जनआंदोलनात एस. एम. जोशी कॉलेज सहभागी
पुणे

बेटी बचाओ जनआंदोलनात एस. एम. जोशी कॉलेज सहभागी

हडपसर, ३० जानेवारी २०२३ (प्रतिनिधी) : 'जन्माचे स्वागत करण्यासाठी त्यातही मुलीच्या जन्माचे'? दचकलात ना. होय आम्ही बेटी बचाव जन आंदोलनवाले Medicare Hospital Foundation मध्ये प्राप्त झालेल्या कन्येचा धूमधडाक्यात साजरा करतोय. असाच आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न आज सौ. रुक्साना अमन सय्यद यांना प्राप्त झालेल्या मुलीचा जन्मोत्सव आज प्राचार्या अश्विनी प्रितम शेवाळे, प्रा. शिला कुदळे, प्रा. मीनाक्षी पवार, डॉ. निशा गोसावी, डॉ. ऋषिकेश खोडदे, डॉ.दिनकर मुरकुटे, प्रा. स्वप्नील ढोरे, डॉ. अतुल चौरे, एन. एस. एस. चे विद्यार्थी, अमन सय्यद यांचे नातेवाईक, हॉस्पिटलचा स्टाफ व डॉक्टर्स यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. डॉ. शंतनु जगदाळे यांनी सूत्रसंचालन करून समाजात घडणाऱ्या घटना सध्यस्थिती यावर विवेचन केले. बेटी बचाव जन आंदोलनच्या समन्वयक तृप्ती राख यांनी गेल्या बारा वर्षांपासून सुरू असलेल्या कार्य...
विद्यापीठ आदिवासी नायकांचे चरित्र पुढे आणणार : प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे 
पुणे

विद्यापीठ आदिवासी नायकांचे चरित्र पुढे आणणार : प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रविवारी 'मुकाबला', 'क्रांतिवीर बिरसा मुंडा' या ग्रंथांचे प्रकाशन प्र. कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या हस्ते झाले. यावेळी डावीकडून डॉ. शितल चौरे, डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. विजय खरे, सुधीर लंके, सोनवणे, प्रा. शिवाजी दिघे, प्रा. अनिल पवळ, डॉ. प्रभाकर देसाई. पुणे (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यात जे आदिवासी नायक स्वातंत्र्यासाठी लढले त्यांची माहिती विद्यापीठ संकलित करत असून, ती ग्रंथरुपाने समाजासमोर आणली जाणार असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी केले. विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात अकोले येथील अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयातील निवृत्त क्रीडा संचालक प्रा. शिवाजीराव दिघे यांनी लिहिलेले 'मुकाबला' हे आत्मकथन व विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्रा. डॉ...
एस. एम. जोशी कॉलेजमधील 2 MAH BN NCC विभागातील विद्यार्थ्यांची दिल्ली येथील रिपब्लिक डे 23 परेडसाठी निवड
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमधील 2 MAH BN NCC विभागातील विद्यार्थ्यांची दिल्ली येथील रिपब्लिक डे 23 परेडसाठी निवड

हडपसर (प्रतिनिधी) : भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुरमु यांच्या उपस्थितीत 74 वा प्रजासत्ताक दिन राजपत दिल्ली येथे संपन्न होणार आहे. 26 जानेवारी 2023 प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन परेड मध्ये एस. एम. जोशी कॉलेजमधील राष्ट्रीय छात्र सेनेमधील तीन कॅडेट्स सहभागी होणार आहेत. यावर्षीचा विशेष बहुमान प्राप्त झालेले एस. एम. जोशी कॉलेजमधील सुरज बाळासाहेब घरत, निखिल अशोक घटी, गिरीश नंदविजय लाड हे तीन कॅडेट्स आहेत. एकूण 250 कॅडेट्स मधून 2- महाराष्ट्र बटालियन व एनसीसी विभाग एस. एम. जोशी कॉलेज हडपसर यांच्या तीन कॅडेट्सची निवड राजपथ दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी झाली आहे. या सर्व कॅडेट्सचे महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. आमदार चेतन (दादा) तुपे, जनरल बॉडी सदस्य मा. दिलीप (...
कवीची ओळख ही त्याच्या वैचारिक भूमिकेतून व्हायला हवी – कवी संतोष पवार
पुणे

कवीची ओळख ही त्याच्या वैचारिक भूमिकेतून व्हायला हवी – कवी संतोष पवार

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये मराठी भाषा पंधरवडानिमित्त काव्यसंमेलन व पत्रकार गौरव समारंभ संपन्न हडपसर (प्रतिनिधी) : समाजाला डोळसपणे पाहून जर काव्य लिहिले तर ते समाजमनाला आवडते. कवीची ओळख ही त्याच्या वैचारिक भूमिकेतून व्हायला हवी. आम्ही चळवळीच्या प्रदेशातील कवी आहोत. त्यामुळेच आमच्या कवितेत वैचारिकता दिसून येते. जिथे श्वास थांबतो तिथे कवितेची ओळ थांबते. जिथे विचार संपतो तिथे कविता संपते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी संतोष पवार (Santosh Pawar) यांनी येथे केले. एस. एम. जोशी कॉलेजमध्ये (SM Joshi College) मराठी विभाग व मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम, वैश्विक कला पर्यावरण यांच्या वतीने मराठी भाषा पंधरवडानिमित्त काव्य संमेलन व पत्रकार गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्या गांधीला टाळून, माहेराला माती होती, माती जन्माची सोबती, बाईपणाच्या जातीला घोर लागल...
एस. एम. जोशी कॉलेजच्या साक्षी काकडे यांना रोइंग स्पर्धेत ब्राँझ मेडल 
क्रीडा

एस. एम. जोशी कॉलेजच्या साक्षी काकडे यांना रोइंग स्पर्धेत ब्राँझ मेडल

हडपसर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन आयोजित महाराष्ट्र स्टेट मिनी ऑलिम्पिक स्पर्धा 2023 रोइंग मुलींच्या स्पर्धेमध्ये एस. एम. जोशी महाविद्यालयातील खेळाडू साक्षी काकडे यांना ब्राँझ मेडल मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांना प्रा. वासावे डी.एल. शारीरिक शिक्षण संचालक यांचे मार्गदर्शन लाभले. उपप्राचार्य प्रा. संजय जडे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य डॉ. किशोर काकडे, सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले....