Tag: Tejaswini Kadam

पिंपरीसाठी तेजस्विनी कदम भाजपकडून इच्छूक
पिंपरी चिंचवड

पिंपरीसाठी तेजस्विनी कदम भाजपकडून इच्छूक

पिंपरी, ता.२५ (लोकमराठी) : पिंपरी मतदार संघातून उच्च शिक्षित युवती तेजस्विनी कदम यांनी भाजप कडून उमेदवारी मागितली आहे. यानिमित्ताने भाजपकडून आता आणखी एक फ्रेश चेहरा समोर आला आहे. त्या युवक व महिलांचा राजकारणातील टक्का वाढविण्याचे काम करणार असल्याने त्यासाठीच राजकारणात उडी घेतली. आमदारकीसाठी दावेदारी दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. पिंपरीकरांचा उत्स्फूर्त आणि मोठा प्रतिसादही तेजस्विनी यांना मिळतो आहे. पिंपरीतून राष्ट्रवादीसह भाजपकडूनही नवे व तरुण इच्छूक यावेळी अधिक आहे. सर्वच पक्ष भाकरी फिरवतील अशी चिन्हे आहेत. त्यामुळे शहरातील तीनपैकी सर्वात लहान असलेल्या या राखीव मतदारसंघातून लहान वयाचेच सर्वच उमेदवार असतील, अशी दाट शक्यता आहे. भाजपही आपल्या अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कट करून नव्यांना संधी देणार आहेत. त्यातूनच नव्या व तरुण चेहऱ्यांनी उमेदवारीसाठी पिंपरीत भाजपकडे गर...