आगाज विजयाचा!..संकल्प विकासाचा : चंद्रशेखर जाधव 

पिंपरी, दि. २ : कसबा विधानसभा निवडणुकीतील (Kasaba by election) कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या विजयाने पुणे जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कसबा निवडणुकीत झालेला हा भाजपच्या पराभवापेक्षा काँग्रेसचा विजय अधिक आहे. भारत जोडो यात्रेनंतर संघटनेत वाढलेल्या आत्मविश्वासाचा फायदा या निवडणुकीत झाल्याचे दिसून येते. असे मत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी व्यक्त केले. 

भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रेमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ‘डरो मत ‘ चा दिलेला नारा काँग्रेसच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला आहे. भाजपाला आपणच आव्हान देऊ शकतो हा आत्मविश्वास कार्यकर्त्यांच्यात निर्माण झाला आहे. भाजपच्या धोरणामुळे शेतकरी, तरुणवर्ग, मध्यमवर्ग सर्वच जण नाराज असून उघड भूमिका घेण्यापॆक्षा मतदानातून नाराजी दाखविण्याचा मतदारांचा कल आहे. आगामी  पुणे-पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने देखील हा निकाल महत्वाचा आहे. 

चंद्रशेखर जाधव

पिंपरी-चिंचवड परिसरातील छोटे उद्योजक, कामगार आणि तरुण हे सर्वच भाजपच्या धोरणावर नाराज असून या निवडणुकीत मिळालेली सहानभूती भविष्यात मिळण्याची शक्यता कमी आहे. यामुळे भारत जोडो यात्रेतून मिळालेली सकारात्मकता आणि भाजपविषयी असणारी नकारात्मकता हा दुहेरीनीती राबवण्याची गरज आहे.  कार्यकर्त्यांच्यात निर्माण झालेल्या या आत्मविश्वासाला योग्य दिशा आणि मार्गदर्शन देण्याची गरज असून कसब्याची पुनरावृत्ती संपूर्ण पुणे जिल्ह्यात झाल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास चंद्रशेखर जाधव यांनी व्यक्त केला. 

Join WhatsApp Group
Exit mobile version