शरद पवार यांच्या विषयी खास 

शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर १९४० रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला

त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार आणि आईचे नाव शारदाबाई पवार आहे

बारामती लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार  सुप्रिया सुळे या त्यांच्या कन्या आहेत

महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांचे पुतणे आहेत

१९५६ साली ते शाळेत असताना त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला

विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले होते 

यशवंतराव चव्हाणांनी पवारांच्यातील सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर शरद पवार त्यांचे शिष्य बनले

वयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले

१९६६ साली त्यांना युनेस्को शिष्यवृत्ती मिळाली. त्याअंतर्गत त्यांनी पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड देशांना भेट देऊन राजकारणाचा अभ्यास केला 

सर्वप्रथम १९६७ च्या राज्य विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले

यशवंतराव चव्हाणांबरोबरच वसंतदादा पाटील हेसुद्धा पवारांचे मार्गदर्शक होते

पण काँग्रेस पक्षाचे १२ आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पाडले

१८ जुलै १९७८ रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला

१९८० साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केले