..या साईट पट्ट्या भरावावर नुसता समाधानी राहणार नाही;वेळ पडली तर जन आंदोलन

..या साईट पट्ट्या भरावावर नुसता समाधानी राहणार नाही;वेळ पडली तर जन आंदोलन

मळवली, दि.१० (लोकमराठी) – भाजे – लोहगड रस्त्याच्या साईड पट्ट्या भरण्यास सुरुवात झाली आहे. अखेर सुरू झालेल्या या कामामुळे शिवप्रेमींच्या मागणीला यश मिळाल्याचे मंचाने म्हटले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे लोहगड-विसापूर विकास मंचाने स्वागत देखील केले आहे.

भाजे-लोहगड रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असताना अखेर रस्त्याच्या साईडपट्ट्या भरण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

भाजे लोहगड रस्ताची अनेक वर्षापासून दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहन चालकांचे वाद-विवाद होत असतात. शनिवार रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक वाढल्यामुळे रस्त्यावर रहदारीचा प्रचंड ताण वाढल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते. याचा फटका स्थानिकांना बसतो. त्यांनाही महत्त्वाच्या कामाला बाहेर जाणे येणे अवघड होते. त्यामुळे त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. लोहगड विसापूर विकास मंच सतत या रस्त्याच्या प्रश्नावर आवाज उठवत आहे. लोहगड विसापूर हे गडकोट मावळचे वैभव आहे. त्यामध्ये लोहगड किल्ला हा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाला असल्यामुळे देश-विदेशातील मोठे पर्यटक या ठिकाणी येत असतात. त्यांचा गडावर येण्याचा प्रवास हा सुखाचा व्हावा अशी लोहगड विसापूर विकास मंचाची भूमिका आहे.

त्यामुळे याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्याच्या साईड पट्ट्या भरण्याचे काम चालू झाले आहे. लोहगड विसापूर विकास मंचा तर्फे याचे स्वागत करण्यात आले.

या साईट पट्ट्या भरावावर नुसता समाधानी राहणार नाही. तर साईड पट्ट्यावर देखील डांबरीकरण आवश्यक आहे. कारण या साईड पट्टीचा भराव पुन्हा वाहून जाऊ शकतो. त्यामुळे यासाठी वेळ पडली तर लोहगड विसापूर विकास मंच स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागाने पुन्हा जनआंदोलन उभे करेल. असा इशारा लोहगड विसापूर मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी दिला.

याप्रसंगी लोहगड विसापूर विकास मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे ,अध्यक्ष विश्वास दौंडकर, मार्गदर्शक संदीप गाडे, कार्याध्यक्ष सागर कुंभार, अनिकेत आंबेकर, बसप्पा भंडारी, अमोल गोरे, गणेश उंडे, गणेश भोसले, अमित जव्हेरी, ओंकार मेढी, सिद्धेश जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते