
पुणे, दि २४ (लोक मराठी) – पुणे रेल्वे स्थानकात कर्तव्य बजावत असलेल्या सिनीयर बुकिंग क्लर्क (सीसीटीसी) यांस चाकुने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन जबरी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना डोबिवली (पुर्व), ठाणे येथुन बंडगार्डन पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नागे कॅलविन सोलोमन मायला (वय वर्षे २९, धंदा रेल्वेत नोकरी, रा. सर्वे नं. ८९ घर नंबर ०४ लेन नं.०६ धायरकर कॉलनी, मुंढवा, पुणे) हे दिनांक १८ मंगळवार २०२६ रोजी रात्री ०१/०० वाजता तिकीट विक्रीचे रेल्वे प्रशानाचे कर्तव्य बजावत असताना त्यांना ०२ अनोळखी चाकुने वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन त्यांचे कडील रोख रक्कम, ०२ मोबाईल फोन, सोन्याची चैन जबरदस्तीने काढुन घेवुन गुन्हा करुन पळुन गेले होते. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन बंडगार्डन पो.स्टे. गु.र.नं. २१२/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०९(२) (६), व इतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. गुन्हा हा रेल्वे प्रशासनातील सरकारी अधिकारी कर्तव्य बजावत असताना आरोपींनी केला होता. गंभीर गुन्ह्याची तात्काळ दखल घेवुन गुन्हा करणाऱ्या आरोपींना अटक करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दोन तपास पथके तयार केली. पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांना योग्य त्या सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.
तपासादरम्यान पुणे रेल्वे स्थानकापासून डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरापर्यंतच्या सुमारे १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले.
गुन्हयातील आरोपीतांनी गुन्हा केल्यानंतर कोणताही पुरावा मागे सोडलेला नसताना त्यांचा पुणे स्टेशन ते डोबिंवली पूर्व, स्टेशन परीसरातील सुमारे १५० सीसीटीव्ही कॅमेरेच्या मदतीने माग काढुन आरोपीतांचे फुटेज मधुन फोटो प्राप्त करुन त्यांचे बाबत माहिती प्राप्त केली असता आरोपी हे मानपाडा पोलीस स्टेशन डोबिंवली (पुर्व), ठाणे हद्दीत गेल्याचे निष्पन्न झाले होते. तपास पथकातील पो.अं. प्रकाश आव्हाड, पो.अं. सारस साळवी यांनी आरोपी हे भोपरगाव कमानी, डोबिंवली (पुर्व) येथे राहत असल्याची गोपणीय बातमी प्राप्त केली. त्यानुसार बंडगार्डन पोलीस व पुणे आर.पी.एफ (खुपीया शाखा) चे पथकने आरोपींनी दि.२१ शुक्रवार २०२६ रोजी पहाटे ०४:०० वाजता शिताफीने ताब्यात घेतले.
जितेद्र मोतीराम राठोड (वय वर्षे २४, रा. रोकडी ता. चाळीसगाव जि. जळगाव सध्या रा. मुंब्रादेवी चाळ, भोपरगाय कमानी, डोंबिवली (पुर्व), ठाणे), ईश्वर गोरख चव्हाण (वय वर्षे २३, रा. दसनाबाद ता. कन्नड जि. संभाजीनगर सध्या रा. मुंबादेवी चाळ, भोपरगाव कमानी, डोंबिवली (पुर्व), ठाणे) यांनी केला असुन त्यांचा नातेवाईक अजय मदन चव्हाण (वय वर्षे ३५, रा. खोली क्र. ०४, मुंब्रादेवी चाळ, भोपरगाय कमानी, डोंबिवली (पुर्व), ठाणे) याने मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपींकडून फिर्यादी यांची चोरी केलेली रोख रक्कम व ०२ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेली आहे. आरोपींनी न्यायालयाने त्यांना दि. २५/०८/२०२६ रोजी पर्यंत वाढीव पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार,
पोलीस सह.आयुक्त सचिन दराडे, अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विनोद सलगरकर, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप-निरीक्षक राहुल पवार, पो.अं. प्रदिप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, निलेश पालवे ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड, पुणे आरपीएफ खुफीया शाखेचे पो. अं. आण्णासाहेब पाखरे, स्वप्नील धनसेर, युवराज गायकवाड यांनी केली आहे.
