कवयित्री प्रा. रेखा पिटके-आठवले यांच्या ‘रेखाचित्रे’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
पिंपरी : कवी अनिल यांच्या म्हणण्यानुसार सध्या काव्याच्या प्रांतात भिन्न मतांतरांमुळे गोंधळ आहे. नव समीक्षकांचा 'वाटते पंथ' उदयास आला आहे. मात्र नवकवींनी अशा टिकाकारांकडे लक्ष न देता कविता लिहिल्या पाहिजेत. कारण ज्याच्यापाशी हृदय आहे, तोच माणूस कविता लिहू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, कवी, गझलकार प्रदीप निफाडकर यांनी केले.
चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे प्रा. सौ. रेखा पिटके- आठवले यांचा षष्ट्यब्दीपूर्ती समारंभ आणि 'काव्यरेखा' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन गझलकार प्रदीप निफाडकर यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन झाले, यावेळी ते बोलत होते. व्यासपिठावर मीडिया कन्सल्टंट गिरीश केमकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर आणि कवयित्री प्रा. रेखा पिटके-आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कवी असणं हे सौभाग्याचं लक्षण असतं, असे सांगून निफाडकर पुढे म्हणाले की पाश्चात्य कवी जेराल्...