KALEWADI : मुख्य रस्ता पाणीपुरवठा व जलनिस्सारण वाहिनीच्या कामाचे आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन

KALEWADI : मुख्य रस्ता पाणीपुरवठा व जलनिस्सारण वाहिनीच्या कामाचे आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन 
  • माजी नगरसेविका निता पाडाळे यांच्या पाच वर्षापासूनच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी (प्रतिनिधी) : काळेवाडी (प्रभाग क्रमांक २२) येथील मुख्य रस्त्याच्या पाणीपुरवठा व जलनिस्सारण वाहिनीच्या कामाला सुरूवात झाली आहे. या कामासाठी माजी नगरसेविका निता पाडाळे यांनी मागील पाच वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते ३१ जानेवारी रोजी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी माजी नगरसेविका निता पाडाळे, माजी नगरसेविका उषामाई काळे, दिलीप आंब्रे, विलास पाडाळे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य काळूराम नढे, विनोद तापकीर, तानाजी काळे, प्रकाश लोहार, पांडुरंग पाडाळे, अ‍ॅड. हर्षद नढे, धर्मा पवार, चंद्रशेखर उंडीकर, शहाजीलाल आत्तार, विकास साठे, अरूण मैराळे, रवींद्र रहाटे, जयश्री नढे, पुष्पा नढे, भरत ठाकुर, राव काका व स्वामी काका, अशोक पवार, मुन्नाभाई गुप्ता, मनन सिंग, लालजी सिंग, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता शिंदे साहेब, उप अभियंता स्थापत्य अंदूरे साहेब, पाणी पुरवठा विभागाचे दीपक पाटील, कनिष्ठ अभियंता कानडे, जलनिस्सारण विभागाचे कनिष्ठ अभियंता अमर जाधव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

KALEWADI : मुख्य रस्ता पाणीपुरवठा व जलनिस्सारण वाहिनीच्या कामाचे आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन 

काळेवाडी मुख्य रस्त्यावरील पिंपरी फुल ते छत्रपती शिवाजी महाराज (एमएम) चौक, बीआरटी मार्ग असे या रस्त्याचे काम होणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणीपुरवठा व जलनिस्सारण (ड्रेनेज) वाहिनी टाकली जाणार आहे. या रस्त्याला महापालिका तयार झाल्यापासून ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यात आली नव्हती. आता हे काम केले जात असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. हे काम सहा कोटींचे असून एक वर्षात हे काम पुर्ण केले जाणार आहे. अशी माहिती माजी नगरसेविका निता पाडाळे यांनी दिली.