पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेत वर्षा कदम प्रथम
शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी केले आयोजन
प्रतिनिधी, २४ सप्टेंबर २०२३ : पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेत आकुर्डी येथील वर्षा कदम यांनी प्रथम क्रमांक पटकावला. महिला भगिनींच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा, यासाठी गणेशोत्सवाचे औचित्य साधत शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या वर्षा कदम यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे अप्रतिम थीम उभारले होते. त्याचबरोबर काळेवाडी येथील पूनम गोरे यांनी स्पर्धेचं द्वितीय पारितोषिक पटकावले. त्यांनी नुकताच महाराष्ट्रभर धुमाकूळ घालत असलेल्या 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाच्या थीमवर सजावट केली होती. स्पर्धेचे तिसरे बक्षीस रहाटणी येथील गीतांजली कुंभार पटकावले. या तिघांनाही आयोजकांच्या वती...