PCMC : काळेवाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

PCMC : काळेवाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
  • काँग्रेस शहराध्यक्षा सायली नढे यांच्या प्रयत्नामुळे नराधम गजाआड

पिंपरी, दि. ५ सप्टेंबर २०२३ : एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरी कोणी नसताना तीच्यावर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधमाला वाकड पोलीसांनी अटक केली. अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पिडीत मुलीच्या भावाने याबाबत आरोपीला जाब विचारला असता, आरोपीनेच तीच्या भावाला कोणाला काही सांगितल्यास हात पाय तोडण्याची धमकी दिली. याप्रकरणी पिडीतीच्या भावाने काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे व सामाजिक कार्यकर्ते किरण नढे यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर नढे दांपत्याने पिडीतीच्या भावाला वाकड पोलीस ठाण्यात घेऊन जात गुन्हा दाखल केला.

सौरभ सुरेश चव्हाण (वय २१) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून वाकड पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, पिडीत मुलगी काळेवाडीत आपला भाऊ व वाहिनीसोबत भाड्याने राहते. तीची वहिनी प्रस्तुतीसाठी गावी गेली असल्याने ती एकटीच भावासोबत राहत होती. तीचा भाऊ खासगी नोकरी करतो. भाऊ कामावर गेला असता, तीएकटीच घरी असायची. सोमवारी (ता. ४) फिर्यादीची तब्येत ठिक नसल्याने तो कामावर गेलो नाही. त्यावेळी त्याची पिडीत लहान बहिण हि गेले दोन तिन दिवसापासुन घरामध्ये गप्प गप्प होती. त्यामुळे त्याने तीला “तु का गप्प आहे, तुला काही त्रास आहे का?” अशी विचारणा केल्यावर तीने रडुन त्याला सांगितले की, दोन महिन्यापुर्वी तीच्या घराच्या पाठीमागे राहणारा आरोपी सौरभ सुरेश चौहान यांच्याशी तीची ओळख झाली. सौरभने तीचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर सौरभ हा नेहमी फोन करीत होता. थोड्या दिवसानंतर सौरभने तीला घराजवळ भेटुन “तु मला खुप आवडते, माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे.” असे म्हणाला.

त्यानंतर सौरभने तीला मोबाईल गिफ्ट दिला. ते दोघेही एकमेकांशी बोलत होते. दि. ७ ऑगस्ट २०२३ रोजी तीचा भाऊ कामानिमीत्त बाहेरगावी गेला होता. त्यादिवशी दुपारी सौरभ पिडीत मुलीला लोणावळा येथे फिरायला घेवुन गेला. लोणावळ्यावरुन ते रात्री घरी परत आले. रात्री अकरा वाजता सौरभ “मला तुझ्यासोबत बोलायचे आहे” असे बोलून तीच्या घरामध्ये आला. “मी तुझ्यासोबत लग्न करणारच आहे, तु माझी बायको आहे” असे बोलून त्याने तीच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर तीचा भाऊ घरी नसताना सौरभने वारंवार तीच्यावर बलात्कार केला.

दरम्यान, ” या महिन्यात मासिक पाळी आली नाही मला खुप टेंन्शन आले आहे ” असे तीने तीच्या भावाला सांगितले, असता त्याने मेडीकल मधुन प्रेग्नसी किट घेवुन येत तीच्या बहिणीची तपासणी केल्यावर ती गरोदर असल्याबाबत समजले. त्यानंतर त्याने सौरभच्या रुमवर जावुन त्यास जाब विचारला असता, त्याने तीच्या भावाला शिवीगाळ करुन “तु जर कोणाला काहीही सांगितले तर तुझे हातपाय तोडुन टाकेल” अशी धमकी दिली.

म्हणुन त्याने बहिणीसह सामाजिक कार्यकर्ते किरण बाबाजी नढे व काँग्रेस शहराध्यक्षा सायली किरण नढे यांच्या घरी जावुन झालेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. नढे दांपत्याने त्याला व पिडीत मुलीला धीर देत त्यांचेसह तक्रार देण्यासाठी वाकड पोलीस स्टेशनमध्ये गेले. वाकड पोलीसांनी तातडीने बलात्कारासह पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.