विवाहितेच्या छळाप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीवर कौटुंबिक हिंसाचार व अॅट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल
कॉंग्रेस महिला शहराध्यक्षा सायली नढे यांच्या प्रयत्नामुळे पिडीतीच्या अन्यायला फुटली वाचा
पिंपरी (प्रतिनिधी) - घरखर्चासाठी माहेरवरून पैशाची मागणी, स्त्रीधन असलेले मंगळसुत्र काढून घेतले. बँक खात्यातील दोन लाख काढून घेतले. तसेच तु आमच्या जातीची नाही, तुझे मुल आम्हाला नको, असे म्हणून विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केला. याप्रकरणी पती, सासू, नणंद व दिर यांच्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार, मारहाण, लुटमार यांच्यासह इतर कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. ही घटना १ ऑगस्ट २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ दरम्यान थेरगाव येथे घडली.
याबाबत एका २३ वर्षीय पिडीत विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती अशी की, एका मागासवर्गीय तरूणीबरोबर प्रेमाचे नाटक करून तीचा आयुष्यभर सांभाळ करिन असे सांगून आरोपी पतीने एक वर्षापुर्वी तीच्याशी लग्न केले....