पिंपरी : सक्षम फाउंडेशन व असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टस पिंपरी चिंचवड यांच्यावतीने निगडी- ट्रान्सपोर्टनगरी येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी (health checkup) शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात स्थलातरीत कामगारांना एड्सबद्दल माहिती देऊन, जनजागृती (AIDS Awareness Camp) करण्यात आली.
या शिबिराचा ७५ जणांनी लाभ घेतला. यामध्ये सक्षम फाउंडेशनमार्फत (Saksham Foundation) या परजिल्ह्यातील कामगारांची एचआयव्ही तपासणी करून औषध पुरवठा करण्यात आला. यावेळी कामगारांना फाउंडेशनच्या प्रकल्प व्यवस्थापक स्नेहल माहुलकर यांनी एड्सबद्दल माहिती देऊन जनजागृती केली.
त्यावेळी स्नेहल माहुलकर म्हणाल्या की, ‘‘एचआयव्ही चाचणी व उपचार यांच्यातील दरी दूर करण्यासाठी असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टसच्या मदतीने स्थलारीत कामगार व मालक यांच्या युनियन यांना सोबत घेऊन एक मोहीम राबवित आहोत.’’
शिबिरामध्ये तालेरा रुग्णालयाचे आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ अनिता बुरूडे, प्रकल्प समुपदेशक वृषाली महाकाळ, आरोग्य सेवक पूजा माने, सुनील मोकल यांनी रुग्णांची तपासणी केली. शिबिरासाठी फाउंडेशनचे संचालक अमर कदम यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
यावेळी असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टसचे अध्यक्ष प्रमोद भावसार, उपाध्यक्ष सुमीत धुमाळ, सचिव अनुज जैन, सदस्य सतनाम सिंह पन्नू, मंजीतसिंह संधू, सुरेशकुमर नेहरा, रमेश चौधरी उपस्थित होते.
- ‘लाडकी बहीण योजने’साठी पुन्हा मुदतवाढ; आता या तारखेपर्यंत अर्ज करता येणार…
- महिलेच्या धाडसामुळे वाचला तरुणाचा जीव
- तीन लाख लाडक्या ‘बहिणी’ राहिल्या वंचित
- एस. एम. जोशी कॉलेजमध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती साजरी
- विद्यार्थ्यांनो आवडीच्या क्षेत्रात करिअर करा; राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे आवाहन