पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेसला अनुकूल वातावरण – कार्याध्यक्ष दिलीप पांढरकर

पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेसला अनुकूल वातावरण - कार्याध्यक्ष दिलीप पांढरकर
  • नवनियुक्त महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांचा सत्कार

लोकमराठी न्यूज नेटवर्क : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकी बाबत कॉंग्रेस पक्षाची तयारी सुरू आहे. सध्या अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सभासद नोंदणीचा उपक्रम आम्ही राबवित असून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आगामी काळात निवडणुकीचे बुथधारकांची यादी यांच्या कामकाजाची मांडणी करण्याबाबत शहरातील विविध भागातील बुथ धारकांची माहिती घेवून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी प्रशिक्षण सुरू आहे. उमेदवार मागणीसाठी अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील कॉंग्रेस पक्षाचा कारभार पारदर्शक असल्याने पिंपरी चिंचवड शहरात कॉंग्रेसला अनुकूल वातावरण दिसून येत असल्याचा विश्वास पांढरकर यांनी व्यक्त केला.

पिंपरी चिंंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या महिला शहराध्यक्षा सायली नढे यांचा सत्कार पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दिलीप पांढरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. दरम्यान आकुर्डी येथील दिलीप पांढरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी, सुजोग थेरपी आदी उपक्रम राबविण्यात आले.

पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेसला अनुकूल वातावरण - कार्याध्यक्ष दिलीप पांढरकर

या आरोग्य शिबीरात १४५ जणांनी सहभाग घेतला होता. या शिबीराचे आयोजन पिंपरी चिंचवड युवक कॉंग्रेसचे सचिव हर्षवर्धन पांढरकर, कॉंग्रेसचे उपशहराध्यक्ष सुरेश लिंगायत यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या विचारधारेला विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी पुणे मनपाचे माजी उपायुक्त डॉ. लक्ष्मण डामसे, डॉ. गणपतराव गोबाळे, ॲड. राजेंद्र काळभोर, बाबुलाल वाघमारे, आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी नवनियुक्त महिला शहराध्यक्षा सायली नढे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व गटतट, राजकारण बाजुला ठेवून पालिका निवडणुकीच्या रिंगणात मोठ्या ताकदीने उतरणार आहोत. तरी या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी मतदारांनच्या घराघरांपर्यंत पोहचणे आवश्यक असल्याचे नढे यांनी सांगितले.

याप्रसंगी पिंपरी चिंचवड कॉंग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष कैलास कदम, शहर युवकाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, तानाजी काटे, छाया देसले, किरण नढे, प्राजक्ता पांढरकर, सोनाली वाल्हेकर, अर्चना कडू, शितल तेली, केतकी डेडसेना, दिनकर भालेकर, अशोक पांढरकर, हणमंत जाधव, संजय साळुंके, सुनीता गवळी, बेंजामिन डिसुझा आदी मान्यवर उपस्थित होते.