राज ठाकरे यांनी एलिझाबेथ २ यांना केले अभिवादन ; म्हणाले…
मुंबई, ता ९ : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (QueenElizabethII) ह्यांचं ७० व्या वर्षी निधन झाले. त्यांना जगभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराणी यांना अभिवादन केले असून त्यांच्या बद्दल मत व्यक्त केले आहे.
राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय ह्यांचं निधन झालं. ७० वर्ष त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. आणि ही ७० वर्ष कुठली? तर जगभरातून राजेशाही संपुष्टात आलेली असताना, जगभरात लोकशाहीचे वारे वेगाने वाहत असतानाची ७० वर्ष. युरोपमधली अनेक राजघराणी ही रक्तरंजित क्रांत्यांनी उलथवून टाकली गेली. पण ब्रिटनची राजेशाही टिकली ती ब्रिटिशांचा त्यांच्या परंपरांविषयी असलेला कमालीचा अभिमान आणि बदलाचे वारे समजून घेत हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर येण्याची तयारी, कधी नाईलाजाने तर कधी आनंदाने दाखवलेल्...