सय्यद भाई यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान

सय्यद भाई यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान

पुणे दि.10: केंद्र शासनाकडून समाजसेवेसाठी 2020 मध्ये जाहीर झालेला ‘पद्मश्री’ पुरस्कार मेहबूब गौस ऊर्फ सय्यदभाई यांना त्यांच्या निवासस्थानी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

पिसोळी येथील श्री. सय्यदभाई यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाला पद्मश्री सय्यदभाई यांचे कुटुंबीय तसेच उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार तृप्ती कोलते, मंडळ अधिकारी व्यंकटेश चिरमुला आदी उपस्थित होते.