सामाजिक

स्वातंत्र्यदिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांकडून शालेय साहित्य वाटप 
सामाजिक

स्वातंत्र्यदिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांकडून शालेय साहित्य वाटप

लोकमराठी न्यूज नेटवर्क : स्वातंत्रदिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल मोहाने व जिल्हा परीषद शाळा मोहाने येथे २००६ साली उत्तीर्ण झालेले माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या वतीने शालेय विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास शालेय कमिटीचे चेअरमन संतोष मोरे, हायस्कूलचे मुख्याध्यापक धनंजय नायकल सर, प्राध्यापक मुरूमकर सर व प्राध्यापक महाडिक मॅडम उपस्थित होत्या. ज्यांच्या संकल्पनेतून साहित्य वाटप करण्यात आले असे कोकण खेड युवाशक्तीचे अध्यक्ष रुपेश मोरे, नितेश मोरे, अजय मोरे व अरुण यादव उपस्थित होते. तसेच शैक्षणिक साहित्य वाटपासाठी ज्यांनी योगदान दिले असे न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यासह कार्यकर्ते ग्रामस्थ, शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. ...
बाईपण भारी देवा….! विशेष मुलांच्या माता-भगिनींसाठी सप्तर्षी फाउंडेशनच्या संकल्पनेतून सहलीचे आयोजन
सामाजिक

बाईपण भारी देवा….! विशेष मुलांच्या माता-भगिनींसाठी सप्तर्षी फाउंडेशनच्या संकल्पनेतून सहलीचे आयोजन

पिंपरी (लोकमराठी) : विशेष ( दिव्यांग )मुलांच्या मातांवर व भगिनींवर विशेष मुलांना सांभाळण्याची मुख्यत्वे जबाबदारी असते. त्यांच्या दैनंदिन जीवनातून त्यांचे स्वतःसाठी एक दिवस त्यांना मुक्तपणे संवाद व संचार करण्यासाठी मिळावा म्हणून विशेष मुलांच्या माता व भगिनींसाठी सदर सहलीचे आयोजन अंजनवेल कृषी पर्यटन मुळाशी, पुणे येथे दिनांक ०६ ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात आले होते. सदर उपक्रमांतर्गत जवळपास अनेक विशेष मुलांच्या माता आणि बहिणींचा संपूर्ण दिवस निसर्गाच्या सानिध्यात, प्रदूषण मुक्त वातावरणात, आनंदात तसेच चविष्ट व सात्विक भोजनाचा आस्वाद घेत पार पडला. विशेष ( दिव्यांग )मुलांच्या मातां व भगिनी यांनी उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे व कुंदाताई भिसे यांचे मनापासून आभार मानले. अनेक महिला आयोजकांचे व व्यवस्थापकांचे आभार मानताना भावुक झाल्या, वर्षातले 365 दिवस कुटुंबासाठी देत असताना एख...
उन्नती सोशल फाउंडेशनच्या अनोख्या सहलीमुळे त्या पालकांच्या चेहऱ्यावर हास्य उमगले
पिंपरी चिंचवड, सामाजिक

उन्नती सोशल फाउंडेशनच्या अनोख्या सहलीमुळे त्या पालकांच्या चेहऱ्यावर हास्य उमगले

दिव्यांगांच्या उन्नतीसाठी उन्नती सोशल फाउंडेशन सदैव प्रयत्नशील - डॉ. कुंदाताई भिसे पिंपरी (दि. १२ ऑगस्ट २०२३) : स्व. राहुल शामराव जोशी यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू ओंकार जोशी आणि पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र येथे विशेष (दिव्यांग) मुलांच्या माता आणि भगिनींसाठी नुकतेच विनामूल्य एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीस पालकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या उपक्रमांतर्गत मोठ्या संख्यने विशेष मुलांच्या माता आणि भगिनींनी संपूर्ण दिवस निसर्गाच्या सानिध्यात, प्रदूषणमुक्त वातावरणात आणि आनंदात घालवला. तसेच तसेच चविष्ट व सात्विक भोजनाचा आस्वाद घेत एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण केली. यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. कुंदाताई भिसे, उद्योजक संजयशेठ भिसे, ओंकार जोशी, अंजनवेल कृषी पर्यटनचे राहुल जगताप...
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे २५०० कापडी पिशव्यांचे वाटप
पिंपरी चिंचवड, सामाजिक

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे २५०० कापडी पिशव्यांचे वाटप

पिंपरी (लोकमराठी न्यूज) : पर्यावरणाच्या संरक्षणासाठी उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिनानिमित्त पिंपळे सौदागर परिसरात २५०० कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. तसेच प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनच्या (Unnati Social Foundation) अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे व संस्थापक संजय भिसे, विठाई वाचनालयाचे सभासद विलास जोशी, देवराव वैद्य, श्रीकृष्ण नीलेगवकर, रमेश वाणी, सुभाषचंद्र पवार, दिलीप चौघुले आदी उपस्थित होते. याबाबत उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे म्हणाल्या की, " सजीवांचे रक्षण करण्यासाठी आपल्या सर्वांनाच पर्यावरणाचे संवर्धन व संतुलन राखणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण स्वतःपासून थोडे तरी प्रयत्न करू शकतो. सध्या प्लास्टिक हा पर्यावरणास हाणी पोहोचवणारा सर्वात मोठा घटक ठरत आहे. त्या अनुषंगाने उन्नती सोशल फा...
सामाजिक कार्यकर्ते रुपेश मोरे यांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
शैक्षणिक, सामाजिक

सामाजिक कार्यकर्ते रुपेश मोरे यांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

रत्नागिरी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानी नंबर-१ (ता. खेड, जिल्हा रत्नागिरी) मधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या हेतूने सामाजिक कार्यकर्ते रुपेश मोरे यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर, दीप्ती यादव मॅडम, शिक्षण समिती अध्यक्ष शिंदे साहेब, उपाध्यक्ष बुमरे ताई, उद्योजक विपुल मोरे, स्वप्नील मोरे व यश दळवी उपस्थित होते. यावेळी शाळेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन उपस्थितांचा सन्मान करण्यात आला. ...
KATRAJ : अजिंक्य भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने भंडी शेगावात दिंडी पंगत संपन्न
सामाजिक

KATRAJ : अजिंक्य भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने भंडी शेगावात दिंडी पंगत संपन्न

पुणे (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : आषाढी वारी निमित्ताने पंढरपूरच्या भक्ती यात्रेत पायी चालणाऱ्या ज्ञानोबा माऊलींच्या रथापुढील दिंडी क्रमांक 97 च्या वैष्णव भक्तांसाठी कात्रज मधील अजिंक्य भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने भंडी शेगाव या गावी पंगत संपन्न झाली. कात्रज ग्रामस्थांच्या वतीने गेले 50 ते 60 वर्षांपासून या दिंडीसाठी पंगत सेवा रुजू करण्याची परंपरा आहे. जुन्या जाणत्यांच्या मार्गदर्शनात आज कात्रज गावची चौथी पिढी ही सेवा रुजू करत आहे. भंडी शेगाव येथे संपन्न झालेल्या पंगतीच्या निमित्ताने, दिंडी क्रमांक 97 चे अध्यक्ष ह.भ.प. भाऊ महाराज परांडे, उपाध्यक्ष योगेश कदम यांनी दिंडीच्या वतीने मंडळाचा अध्यक्ष या नात्याने प्रतिक कदम यांचा सत्कार केला. या मंडळाचे संस्थापक सुरेश कदम आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय सुरेश कदम, प्रभाकर बाबा कदम, किसन आण्णा जेधे, आप्पासाहेब गायकवा...
शिवशाही व्यापारी संघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी स्वप्निल शेलार यांची निवड
सामाजिक

शिवशाही व्यापारी संघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी स्वप्निल शेलार यांची निवड

पुणे : शिवशाही व्यापारी संघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी स्वप्निल जयवंत शेलार यांची निवड करण्यात आली. याबाबत संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेशाध्यक्ष धनंजय ढावरे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाध्यक्षपदी शेलार यांची निवड मध्यवर्ती कार्यालय मुंबई या ठिकाणाहून संस्थापक-अध्यक्ष दाखले यांनी जाहीर केली. नवनियुक्त जिल्हाध्यक्षांनी सर्वसामान्य जनतेच्या, कलाकार बांधवांच्या व व्यापारी बांधवांच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी सदैव कटिबध्द राहण्याच्या सूचना देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी दाखले यांनी शुभेच्छा दिल्या. ...
‘नातं विश्वासाचे’ क्लबच्या युवकांची तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात ‘प्लास्टिक मुक्त वारी’ 
पुणे, सामाजिक

‘नातं विश्वासाचे’ क्लबच्या युवकांची तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात ‘प्लास्टिक मुक्त वारी’

दिवे घाट, पुणे (लोकमराठी न्यूज) : 'प्लस्टिक मुक्त वारी ' या उपक्रमांतर्गत " नातं विश्वासाचे " या क्लब ने आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेत तळेगाव येथील नूतन कॉलेज ऑफ इंजिनिरिंग व रिसर्च मधील NSS च्या स्वयंसेवकांना सहभागी होण्याची संधी मिळाली. “नातं विश्वासाचे”क्लब व एन एस एस (नूतन कॉलेज ऑफ इंजिनीरिंग आणि रिसर्च )च्या एकूण ८० युवकांच्या व ८ शिक्षकांच्या समूह तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले. खरं तर जास्त करून सर्वांची ही पहिलीच वारी पण ३२ किलोमीटर चा प्रवास सर्वांनी सुखरूप पणे पूर्ण केली. दोन्ही पालखी चे दर्शन घेत पुणे स्टेशन पासून सासवड पर्यंतची ३२ किलोमीटर ची पाय वारी पूर्ण केली. त्यात सर्वात कठीण टप्पा मानला जाणाऱ्या ४ किलोमीटर चा दिवे घाट सर्व ८० विद्यार्थ्यांनी पूर्ण केला. दिवे घाटात सर्व विध्यार्थ्यांनि एकूण १०८ पोती ,...
पोलीस सारथीच्या काळेवाडी रहाटणी विभाग युवकाध्यक्षदी छगन जायभाये यांची नियुक्ती 
सामाजिक

पोलीस सारथीच्या काळेवाडी रहाटणी विभाग युवकाध्यक्षदी छगन जायभाये यांची नियुक्ती

पिंपरी चिंचवड : पोलीस सारथी सामाजिक संस्थेच्या काळेवाडी रहाटणी विभागाच्या युवकाध्यक्षपदी छगन पोपट जायभाये यांची नियुक्ती करण्यात आली. याबाबत (Police Sarathi) संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शहाजी अंकुशराव भोसले यांनी जायभाये यांना नियुक्तीपत्र दिले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे यांचा प्रमोद गायकवाड यांच्या वतीने सन्मान
सामाजिक

प्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे यांचा प्रमोद गायकवाड यांच्या वतीने सन्मान

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क भोसरी ता. १६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संघर्ष प्रतिष्ठान यांच्या वतीने प्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे यांचा भारदार गायनाचा कार्यक्रम भोसरी या ठिकाणी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मिलिंद शिंदे आले असता मानव सुरक्षा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्या वतीने मिलिंद शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आयोजक संघर्ष प्रतिष्ठान भोसरी अध्यक्ष नितीलेश, बंटी, शत्रुघन डोळस, मच्छिंद्र राखपसरे तसेच संघर्ष प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी परिसरातील नागरिक आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...