पर्यावरणाच्या संरक्षणासाठी उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे २५०० कापडी पिशव्यांचे वाटप

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे २५०० कापडी पिशव्यांचे वाटप

पिंपरी (लोकमराठी न्यूज) : पर्यावरणाच्या संरक्षणासाठी उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिनानिमित्त पिंपळे सौदागर परिसरात २५०० कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. तसेच प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनच्या (Unnati Social Foundation) अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे व संस्थापक संजय भिसे, विठाई वाचनालयाचे सभासद विलास जोशी, देवराव वैद्य, श्रीकृष्ण नीलेगवकर, रमेश वाणी, सुभाषचंद्र पवार, दिलीप चौघुले आदी उपस्थित होते.

याबाबत उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे म्हणाल्या की, ” सजीवांचे रक्षण करण्यासाठी आपल्या सर्वांनाच पर्यावरणाचे संवर्धन व संतुलन राखणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण स्वतःपासून थोडे तरी प्रयत्न करू शकतो. सध्या प्लास्टिक हा पर्यावरणास हाणी पोहोचवणारा सर्वात मोठा घटक ठरत आहे. त्या अनुषंगाने उन्नती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून नागरिकांना कापडी पिशव्या वाटप करून प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याचे आवाहन करण्यात आले. “