
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) - एका कंपनीच्या नावाचे बनावट पेनड्राईव्ह व मेमरी कार्ड विक्री करत असल्याप्रकरणी तिघांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) कॉपी राईट कायद्यानुसार गुन्हा दाखरल करण्यात आला आहे. हा प्रकार येथील डिलक्य चौकतील डिलक्स मॉल (Delux Mall) येथे शनिवार (दि. १५) उघडकीस आला.
याबाबत महेश विष्णु कांबळे (वय ४२, रा. जनवाडी, शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यावरुन कृष्णा अमराराम भाटी (वय २७, रा. १००३/ऐ, यशदा प्लोअरींग, पिंपरीगाव), मुकेशकुमार लालाराम (वय २८, सोनिगरा रेसिडेन्सी, नढेनगर, काळेवाडी) व राजेशकुमार ओबाराम चौधरी (वय २७, रा. २०२, अष्टविनायत बिल्डींग, नढेनगर, काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कंपनीचे स्वामीत्य असलेल्या कंपनीचे बनावट पेनटड्राईव्ह व मेमरी कार्ड विक्री करताना आरोपी आढळून आले आहे. या प्रकरणाचा पुढीस तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कापरे करत आहेत.