‘सायकलकरी वारकऱ्यांच्या’ पुणे-पंढरपूर-पुणे वारीमुळे पर्यावरण बचतीचा संदेश – संजयशेठ भिसे
तब्ब्ल १५०० 'सायकलकरी वारकऱ्यांच्या' वारीला दाखविला भगवा झेंडा
पिंपरी (दि. ०३) : भारतातील क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या इन्डो अथलेटिक्स सोसायटीच्या सायकल वारीने आज देहू येथील गाथा मंदिर परिसरातून प्रस्थान केले. तब्ब्ल १५०० 'सायकलकरी वारकऱ्यांच्या' पुणे-पंढरपूर-पुणे वारीला आज शनिवारी (दि. ३) रोजी पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनचे (Unnati Social Foundation) संस्थापक संजयशेठ भिसे यांनी भगवा झेंडा दाखवला.
या वारीसाठी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरामध्ये ऑनलाईन नोंदणी करण्यात आली होती. हे सायकलस्वार तब्बल पाचशे किलोमीटरचे अंतर केवळ दोन दिवसात पार करणार आहेत. सायकल वारीचे हे त्यांचे सातवे वर्ष आहे.
यावेळी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन वानखेडे, प्रकाश शेडबाळे, उन्नती फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, वैद्यनाथ हॉस्पिटल औरंगाबादचे डॉक्टर संदी...