पावसाळ्यापूर्वी विद्युत डीपी बॉक्स व रस्ते दुरुस्ती, नाले, ड्रेनेज व स्ट्रॉम वॉटर लाईनची सफाई करा : सायली नढे

पावसाळ्यापूर्वी विद्युत डीपी बॉक्स व रस्ते दुरुस्ती, नाले, ड्रेनेज व स्ट्रॉम वॉटर लाईनची सफाई करा : सायली नढे
  • महिला काँग्रेसचे महापालिका अधिकाऱ्यांना निवेदन

पिंपरी, दि. १७ : पावसाळा सुरू होण्याआधी शहरातील ड्रेनेज, स्ट्रॉम वॉटर लाईन व नाले सफाई तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती व विद्युत डीपी बॉक्स दुरुस्ती करा. अशी मागणी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत महिला काँग्रेसने महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील व विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षा सायली किरण नढे, उपाध्यक्षा आशा भोसले, परिवहन विभागाच्या प्रदेश महिला उपाध्यक्षा स्वाती शिंदे उपस्थित होत्या.

पावसाळ्यापूर्वी विद्युत डीपी बॉक्स व रस्ते दुरुस्ती, नाले, ड्रेनेज व स्ट्रॉम वॉटर लाईनची सफाई करा : सायली नढे

महापालिका अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पहिल्या पडलेल्या अवकाळी पावसामुळे शहरांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. शहरातील महावितरणच्या विद्युत डीपी बॉक्स नादुरुस्त असल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे तातडीने शहरातील ड्रेनेज लाईन सफाई व विद्युत डीपी बॉक्स दुरुस्त करणे गरजेचे आहे.

पावसाळ्यापूर्वी विद्युत डीपी बॉक्स व रस्ते दुरुस्ती, नाले, ड्रेनेज व स्ट्रॉम वॉटर लाईनची सफाई करा : सायली नढे