Tag: Pimpri Chinchwad Municipal Corporation

पावसाळ्यापूर्वी विद्युत डीपी बॉक्स व रस्ते दुरुस्ती, नाले, ड्रेनेज व स्ट्रॉम वॉटर लाईनची सफाई करा : सायली नढे
पिंपरी चिंचवड

पावसाळ्यापूर्वी विद्युत डीपी बॉक्स व रस्ते दुरुस्ती, नाले, ड्रेनेज व स्ट्रॉम वॉटर लाईनची सफाई करा : सायली नढे

महिला काँग्रेसचे महापालिका अधिकाऱ्यांना निवेदन पिंपरी, दि. १७ : पावसाळा सुरू होण्याआधी शहरातील ड्रेनेज, स्ट्रॉम वॉटर लाईन व नाले सफाई तसेच रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती व विद्युत डीपी बॉक्स दुरुस्ती करा. अशी मागणी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत महिला काँग्रेसने महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील व विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षा सायली किरण नढे, उपाध्यक्षा आशा भोसले, परिवहन विभागाच्या प्रदेश महिला उपाध्यक्षा स्वाती शिंदे उपस्थित होत्या. महापालिका अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पहिल्या पडलेल्या अवकाळी पावसामुळे शहरांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. शहरातील महावितरणच्या वि...
शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अरूण चाबुकस्वार यांचा सन्मान
शैक्षणिक, पिंपरी चिंचवड

शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अरूण चाबुकस्वार यांचा सन्मान

पिंपरी : स्वातंत्र्यदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल न्यु सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कुलचे संस्थापक अरूण चाबुकस्वार यांचाही सन्मान करण्यात आला. महापौर उषा (माई) ढोरे, उपमहापौर हिराबाई (नानी) घुले, नगरसेविका निर्मला कुटे, नगरसेविका सुनीता तापकीर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन चाबुकस्वार यांना सन्मानित करण्यात आले. ...
महापालिकेतर्फे नवी सांगवीत प्लास्टिक मुक्त अभियान|१५ हजार रूपयांची केली दंडात्मक कारवाई
पिंपरी चिंचवड

महापालिकेतर्फे नवी सांगवीत प्लास्टिक मुक्त अभियान|१५ हजार रूपयांची केली दंडात्मक कारवाई

नवी सांगवी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्वच्छ भारत अभियानांतर्गत नो टू सिंगल युज ऑफ प्लास्टिक अभियान प्रभाग क्रमांक ३१, नवी सांगवी मध्ये घेण्यात आले. साई चौक येथील मंडई परिसरामध्ये व्यवसायिकांना व नागरिकांना अवैध प्लास्टिकचा वापर न करणेबाबत आवाहन करण्यात आले. त्यावेळी बरेच नागरिक प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा वापर करत असल्याचे दिसून आले. तसेच “नको दंड नको ना शिक्षा, प्लास्टिक मुक्त पिंपरी-चिंचवड शहर हीच अपेक्षा” या बोधवाक्य चा पाढा वाचत आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी आरोग्य निरीक्षक यांनी प्रभागातील सर्व भाजी विक्रेते, मटन मासोळी व्यावसायिक यांच्याकडून अवैध प्लास्टिकचा वापर न करणे बाबत सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. सर्व व्यावसायिकांनी याला उत्तम प्रतिसाद दिला. ह क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी रमेश भोसले, मुख्य आरोग्य निरीक्षक आढाव, आरोग्य न...
विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यालयावर ‘पे अँड पार्किंग’च्या ठरावाची होळी
पिंपरी चिंचवड

विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यालयावर ‘पे अँड पार्किंग’च्या ठरावाची होळी

https://youtu.be/KP68TgMma6w पे अँड पार्किंग विरोधातील आंदोलनाला विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांचा पाठिंबा पिंपरी चिंचवड: शहरामध्ये शिस्तीच्या नावाखाली जनतेचा विरोध जुगारून केवळ महसूल गोळा करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी " पे अँड पार्किंग " धोरण लागू केले. याविरोधात अपना वतन संघटनेने सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांना तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे . तसेच सर्वसामान्य जनतेच्या भावना राजकीय पक्षांच्या जबाबदार लोकप्रतिनिधीं समोर मांडण्याचा व पे अँड पार्किंग धोरण चुकीचे आहे हे सांगण्याकरता त्यांच्या स्थानिक कार्यालयावर आंदोलने सुरु केली आहेत. याचाच एक भाग म्हणून संघटनेच्या वतीने शनिवारी (दि. ३१ जुलै) विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्या आकुर्डी येथील जनसंपर्क कार्यालयावर पे अँड पार्किंग च्या प्रस्तावाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात करण्या...
सफाई कामगारांच्या वेतनावर ठेकेदारांचा “डल्ला”
पिंपरी चिंचवड

सफाई कामगारांच्या वेतनावर ठेकेदारांचा “डल्ला”

संग्रहित छायाचित्र किमान वेतनापासून महिला सफाई कामगार वंचितच; ठेकेदारांवर कारवाई कोण करणार? पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 'फ' क्षेत्रिय कार्यालयांतर्गत झाडलोट सफाई कामगार महिला हे गेली १५ वर्षापासून कार्यरत आहेत, संबंधित ठेकेदाराकडून किमान वेतना नुसार पगार दिला जात नाही, त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार केला जात आहे, संबंधित ठेकेदाराने सर्व महिला कांमगारांचे 'एटीएम' कार्ड ठेकेदाराकडेच ठेवले आहेत, त्यामुळे झाडलोट करणारे सफाई महिला कामगार महिलांच्या वेतनावर ठेकेदार डल्ला मारत असुन सफाई कामगार महिलांची पिळवणूक केली जात आहे, उन्हातान्हात कबाड कष्ट करून देखील या महिलांना आपल्या हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई कोण करणार असा सवाल बहुजन सम्राट सेना डॉ, बाबासाहेब आंबेडकर ग्रुपच्या वतीने उपस्थित केला जात आहे. या कंत्राटी महिला कामगारांना अनेक समस्यांचा सामना ...