महापालिकेतर्फे नवी सांगवीत प्लास्टिक मुक्त अभियान|१५ हजार रूपयांची केली दंडात्मक कारवाई

महापालिकेतर्फे नवी सांगवीत प्लास्टिक मुक्त अभियान|१५ हजार रूपयांची केली दंडात्मक कारवाई

नवी सांगवी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्वच्छ भारत अभियानांतर्गत नो टू सिंगल युज ऑफ प्लास्टिक अभियान प्रभाग क्रमांक ३१, नवी सांगवी मध्ये घेण्यात आले. साई चौक येथील मंडई परिसरामध्ये व्यवसायिकांना व नागरिकांना अवैध प्लास्टिकचा वापर न करणेबाबत आवाहन करण्यात आले. त्यावेळी बरेच नागरिक प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा वापर करत असल्याचे दिसून आले.

तसेच “नको दंड नको ना शिक्षा, प्लास्टिक मुक्त पिंपरी-चिंचवड शहर हीच अपेक्षा” या बोधवाक्य चा पाढा वाचत आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी आरोग्य निरीक्षक यांनी प्रभागातील सर्व भाजी विक्रेते, मटन मासोळी व्यावसायिक यांच्याकडून अवैध प्लास्टिकचा वापर न करणे बाबत सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. सर्व व्यावसायिकांनी याला उत्तम प्रतिसाद दिला.

ह क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी रमेश भोसले, मुख्य आरोग्य निरीक्षक आढाव, आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, सुनील चव्हाण, संजय मानमोडे, धनश्री जगदाळे इ. उपस्थित होते. अवैध प्लास्टिकचा वापर न करणेबाबत सामाजिक प्रबोधन नवी सांगवी येथे घेण्यात आले. तसेच नवी सांगवी मध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकची विक्री करणाऱ्या बड्या व्यावसायिकांवर अवैध प्लास्टिक बाळगल्याबद्दल कृष्णा चौक नवी सांगवी येथील तीन व्यावसायिकांवर प्रत्येकी पाच हजार प्रमाणे १५ हजार रुपये दंडात्मक कारवाई करून तब्बल १४० किलो अवैध प्लास्टिक आरोग्य विभागामार्फत जप्त करण्यात आले.

सदर कारवाई सहाय्यक आरोग्य अधिकारी रमेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मुख्य आरोग्य निरीक्षक महेश आढाव, आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, संजय मानमोडे, सुनील चव्हाण, धनश्री जगदाळे आरोग्य सहाय्यक राहुल जेटीथोर, रवी रोकडे, रूपाली साळवे, दशरथ बांबळे आरोग, मदतनीस ज्योती भालेराव तसेच कुणाल कांबळे, दिलीप नाईकनवरे, सिद्धार्थ जगताप, प्रवीण गायकवाड, गणेश भंडारी, मारुती देवकुळे, विनोद कांबळे, संतोष कदम इ. आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.