मराठा आरक्षणा संबंधी समन्वयकांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपची उच्चस्तरीय चौकशी करा
संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे यांची राज्यपालांकडे मागणी
पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर मराठा आरक्षण शमविण्यासाठी मराठा मोर्चाच्या स्वयंघोषित समन्वयकांची एक ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. या क्लिपमध्ये मराठा आरक्षण शमविण्यासाठी आंदोलनात फूट पाडण्याच्या हेतूने तात्कालिन सत्ताधारी नेत्यांनी पैशाची देवाण-घेवाण केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यामधील संबंधीत आत्ताचे मराठा आरक्षण उप-समितीचे अध्यक्ष व विद्यमान मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना पैशांचे आमिष दाखवून मराठा आरक्षणा संदर्भांत निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या काही स्वयंघोषित समन्वयकांबरोबर प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे सदर ऑडिओ क्लिपच्या संभाषणावरुन स्पष्ट होत आहे.त्यामुळे व्हायरल झालेल्या ऑडिओ तात्काळ चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात य...