माझ्या खुशीला शोधा! तरूणीची आर्त हाक | शोधुन देणारास बक्षीस

पिंपरी : “खुशी माझ्या कुटूंबातील सदस्य असून ती गायब झाल्यापासून मला खुप त्रास होताय, कृपया खुशीला शोधून द्या.” अशी भाऊक साद घालत तरूणीचे अश्रू अनावर झाले. या तरूणीला खुशीचा ऐवढा लळा लागला आहे की, तीला शोधण्यासाठी ही तरूणी वणवण भटकत आहे.

सविस्तर माहिती अशी की, प्रज्ञा पुजारी या तरूणीची खुशी नावाची भारतीय (गावठी) कुत्री तीन दिवसांपासून निगडी परिसरातून हरवली आहे. याबाबत प्रज्ञा यांनी रावेत पोलिस चौकीत तक्रार दाखल केली आहे.

या कुत्रीला शोधुन देणारास ३००० रूपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. सदर कुत्री (खुशी) दिसल्यास 7972300958 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन प्रज्ञा यांनी केले आहे.

माझ्या खुशीला शोधा! तरूणीची आर्त हाक | शोधुन देणारास बक्षीस